Indian Navy Day 2024 Wishes: भारतीय 'नौदल दिना'निमित्त खास Images, Greetings, WhatsApp Status, Messages शेअर करून करा जवानांच्या शौर्याला सलाम
त्यावेळी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Indian Navy Day 2024 Wishes In Marathi: भारतीय नौदल दिन दरवर्षी 4 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. भारतीय नौदलाचे शौर्य, समर्पण आणि देशाच्या सागरी सीमांचे रक्षण करण्यात त्यांची भूमिका यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. नौदल दिन भारतीय नौदलाचे सामर्थ्य, धैर्य आणि देशासाठी समर्पणाचे प्रतीक आहे. हा दिवस आपल्याला आपल्या सुरक्षा दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची आणि त्यांचे योगदान समजून घेण्याची संधी देतो. भारतीय नौदल दिन साजरा करण्याची सुरुवात मे 1972 मध्ये झालेल्या वरिष्ठ नौदल अधिकारी परिषदेत झाली. त्यावेळी 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारत आणि पाकिस्तानमध्ये 1971 साली युद्ध झाले होते. या युद्धात पाकिस्तानने 3 डिसेंबरला भारतीय विमानतळावर हल्ला केला. पाकिस्तानी लष्कराच्या आक्रमक हल्ल्याला प्रत्युत्तर देत भारतीय नौदलाने 4 आणि 5 डिसेंबरच्या रात्री हल्ल्याची योजना आखली आणि 'ऑपरेशन ट्रायडंट' पार पाडले. या काळात लष्कराने पाकिस्तानी नौदलाचे मोठे नुकसान केले. या मोहिमेत भारतीय नौदलाचे नेतृत्व कमोडोर कासारगोड पट्टनशेट्टी गोपाल राव यांनी केले. नौदलाचे यश आणि प्रयत्न लक्षात घेऊन 4 डिसेंबर हा नौदल दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
भारतीय नौदल दिनानिमित्त खास Messages, Wishes, Images, Quotes, Greetings पाठवून करा नौसैनिकांच्या अदम्य धैर्याला, त्यांच्या कामगिरीला सलाम (हेही वाचा: Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din Speech: डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त लहान मुलांसाठी खास भाषणांचे नमुने
दरम्यान, नौदल दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या कालावधीत नौदलाच्या युद्धनौकांच्या क्षमतांचे प्रात्यक्षिक, चर्चासत्रे, परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. या कार्यक्रमांद्वारे जनतेला नौदलाची ताकद आणि तांत्रिक प्रगतीची जाणीव करून दिली जाते.