Independence Day 2021 Fancy Dress Idea: स्वातंत्र्यदिनानिमित्त फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी 'या' वेशभूषा साकारून आपल्या मुलांना करा तयार

पण तरीही तुम्ही हा दिवस तुमच्या मुलासाठी खास बनवला पाहिजे. जर आपण मुलासाठी या वेळी कोणती वेशभूषा करावी याबद्दल गोंधळलेले असाल तर आज आम्ही आपल्याला काही फॅन्सी ड्रेसच्या आयडिया देत आहोत.

Independence Day Fancy Dress Idea ( Photo: Wikimedia )Commons

अनेक वर्षे ब्रिटिशांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी देशाला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण स्वातंत्र्य दिन साजरा करतो. या दिवशी शाळांमध्ये भरपूर तयारी केली जाते आणि मुले फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतात. बऱ्याच सोसायटींमध्येही वेशभूषा आयोजित केली जाते . मुलांसाठी, फॅन्सी ड्रेस स्पर्धा हा एक अभिमानास्पद क्षण असतो कारण या दिवशी ते त्यांच्या आवडत्या क्रांतिकारकांचे पोशाख घालतात.यावेळी ही तुमच्या मुलांनी फॅन्सी ड्रेस स्पर्धेत भाग घेतला असेलच . यावेळी 15 ऑगस्टचा उत्सव कोरोनामुळे नेहमीच पेक्षा वेगळा असेल. पण तरीही तुम्ही हा दिवस तुमच्या मुलासाठी खास बनवला पाहिजे. जर आपण मुलासाठी या वेळी कोणती वेशभूषा करावी याबद्दल गोंधळलेले असाल तर आज आम्ही आपल्याला काही फॅन्सी ड्रेसच्या  आयडिया देत आहोत. ( Independence Day 2021 Recipe: यंदा स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घरच्या घरी बनवा 'या' कलरफुल रेसिपी )

भारत माता

यावेळी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, तुम्ही तुमच्या मुलीला भारत मातेचा गेटअप देऊ शकता.यासाठी तुम्ही तुमच्या मुलीला केशर किंवा पांढरी किंवा केशरी साडी, तिच्या डोक्यावर मुकुट आणि हातात तिरंगा द्यावा लागेल.

View this post on Instagram

A post shared by UMMEES (@ummees_foods)

महात्मा गांधी

राष्ट्रपिता महात्मा गांधींसारखे होण्यासाठी मुलांमध्ये स्पर्धा असते . गांधींचा गेटअप घेणे देखील खूप सोपे आहे.यासाठी आपल्या मुलावर पांढरा धोतर गुंडाळा. डोक्यावर त्वचेच्या रंगाची कलर लावा जेणेकरून ते टक्कल सारखे देईल. गांधी चष्मा लावा आणि हातात काठी दया .

View this post on Instagram

A post shared by UMMEES (@ummees_foods)

बाळ गंगाधर टिळक

तुमच्या मुलांना लोकमान्य टिळक अर्थात बाल गंगाधर टिळकांची वेशभूषा ही आवडू शकते. त्यामुळे तुम्ही बाळ गंगाधर टिळक यांची वेशभूषा ही करू शकतात.

क्रांतिकारी

त्याचबरोबर देशातील अनेक महान क्रांतिकारकांची वेशभूषा देखील तुम्ही निवडू शकता.