Independence Day 2020 Rangoli Designs: स्वातंत्र्य दिनानिमित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून साजरा करा आजचा दिवस

Independence Day Special Rangoli (Photo Credits: Artopia Creatives, CRAFTIFY YouTube)

Independence Day 2020 Rangoli Designs: यंदा 15 ऑगस्ट रोजी देशात 74 वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात येणार आहे. आझादीच्या दिवसाचा उत्सव साजरा करण्यासाठी त्यासंदर्भातील तयारी जोरात सुरु झाली आहे. या दिवशी गरीब, श्रीमंत असा भेदभाव न करता सर्वजण एकजूट होऊन तिरंग्याला सलाम करतात. जवळजवळ 200 वर्ष इंग्रजांची गुलामी केल्यानंतर देशाला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले. याच आझादीच्या पर्वाला भारतात फार महत्व असून त्याचा आनंद मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. परंतु सध्या देशावर आलेल्या कोरोना व्हायरसच्या महासंकटामुळे स्वातंत्र्य दिनाचा उत्साह फिका पडल्याचे दिसून येणार आहे. मात्र तुम्ही घरच्या घरी स्वातंत्र्य दिन साजरा करु शकता. सोशल डिस्टंन्सिंगच्या नियमाचे पालन करत स्वातंत्र्य दिन साजरा करण्यास काही हरकत नाही.

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केले जाते. नागरिक सफेद, केशरी आणि हिरव्या रंगाचे कपडे घालून राष्ट्रध्वजाची शान वाढवतात. त्याचसोबत घरात ट्राय रंगाचे खाद्यपदार्थ सुद्धा बनवले जाताात. घराच्या मुख्य द्वारापाशी, शाळेत किंवा ऑफिसमध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त स्पेशल रांगोळी सुद्धा काढली जाते. तर याच दिवसाचे औचित्य साधत यंदाच्या स्वातंत्र्य दिनामिनित्त 'या' मनमोहक आणि सोप्प्या Tricolor च्या रांगोळी डिझाइन्स काढून आजचा दिवस साजरा करा.(Independence Day 2020: कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावात स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी MHA कडून गाईडलाईन्स जारी)

दरम्यान, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांच्या जाचापासून मुक्तता मिळत आझादी मिळाली होती. देशाला आझादी मिळावी म्हणून बहुतांश वीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. या दिवशी याच स्वातंत्र्यसेनानिंना स्मरुन श्रद्धांजली ही वाहिली जाते. देशभक्तीपर गाणी गायली जातात. प्रत्येक जण स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आपल्या आपल्या पद्धतीने साजरा करताना दिसून येतात. तर तु्म्ही रांगोळीच्या माध्यमातून तुमच्या देशभक्तीच्या भावना जाहीर करु शकता.