Janmashtami Celebration At Govardhan Ecovillage: वृंदावनला जाऊ शकत नसाल तर मुंबईजवळ 'येथे' साजरी करा यंदाची 'जन्माष्टमी'; पहा संपूर्ण कार्यक्रमांची यादी
जेथे तुम्ही वृंदावनसारख्या दृश्याचा अनुभव घेऊ शकता. 26 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमी चा उत्सव साजरा होणार आहे.
Janmashtami Celebration At Govardhan Ecovillage: श्रीकृष्ण जन्माष्टमी (Shri Krishna Janmashtami) चा सण जसजसा जवळ येत आहे, तसतशी भाविकांची मोठी गर्दी मथुरा-वृंदावनच्या दिशेने निघाली आहे. त्यामुळे अनेक कृष्ण भक्तांना मंदिराचे गर्भगृह किंवा तेथे चालणारे अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उपक्रम पाहायला मिळत नाहीत. या कारणांमुळे अनेकांना वृंदावनात (Vrindavan) जाण्याचे धाडस जमत नाही. जर तुम्हीही अशा लोकांमध्ये असाल आणि तुम्हालाही वृंदावनमध्ये कृष्ण जन्माष्टमीचा आध्यात्मिक लाभ घ्यायचा असेल, आणि तेही मुंबईत किंवा त्याच्या आसपास राहून तर आम्ही तुम्हाला असं ठिकाण सांगणार आहोत. जेछे तुम्ही वृंदावनसारख्या दृश्याचा अनुभव घेऊ शकता. 26 ऑगस्ट 2024 रोजी देशभरात कृष्ण जन्माष्टमी चा उत्सव साजरा होणार आहे.
जन्माष्टमीच्या शुभ मुहूर्तावर, गोवर्धन इको व्हिलेजमध्ये 26 ऑगस्ट 2024 रोजी भगवान कृष्णाच्या जन्माच्या स्मरणार्थ विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. चला तर मग याठिकणी होणाऱ्या कार्यक्रमांचे वेळापत्रक जाणून घेऊयात. (हेही वाचा - Krishna Janmashtami 2024 Date: जाणून घ्या यंदा 26 की 27 ऑगस्ट, कधी साजरी होणार जन्माष्टमी; निर्माण होत आहे दुर्मिळ आणि शुभ संयोग)
- श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिरात सकाळी 04.30 ते 05.00 पर्यंत मंगल आरतीने उत्सवाची सुरुवात होईल.
- श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिरात सकाळी 05.15 ते 05.00 पर्यंत दुसरी मंगल आरती होईल.
- सकाळी 05.15 ते 05.00 पर्यंत यज्ञशाळेत आशीर्वाद देऊन, प्रसादाने वातावरण शुद्ध करून यज्ञ केला जाईल.
- 05.15 AM श्री श्री राधा वृंदावन बिहारी मंदिर आणि श्री श्री राधामोहन मंदिर या दोन्ही ठिकाणी भाविकांसाठी विशेष जन्माष्टमी दर्शन आणि कीर्तनाचे आयोजन केले जाईल.
- हे सत्र सकाळी 08.00 वाजेपर्यंत चालणार आहे, जेणेकरून सर्व भाविकांना भावपूर्ण कीर्तनात सहभागी होण्याचा आणि देवतांचे दर्शन घेण्याचा लाभ मिळेल.
- 08.00 AM ते 09.30 AM ला श्री एचजी माधव गोपाल प्रभू कृष्णकथा सांगतील. ज्यामध्ये भगवान श्री कृष्णाचे जीवन आणि शिकवण याबद्दल माहिती दिली जाईल. यानंतर दिवसभर दर्शन, कीर्तन व प्रसाद वाटप सुरू राहणार आहे.
संध्याकाळच्या उत्सवाचे वेळापत्रक -
संध्याकाळी 09.30 वाजता राधा वृंदावन बिहारी मंदिर सभागृहात श्री श्री राधा बिहारी यांच्या कीर्तनाने आणि अभिषेक आणि आरतीने कार्यक्रमाला सुरुवात होईल, त्यानंतर भगवानांना नैवेद्य अर्पण केले जाईल. रात्री 12.00 ते 12.30 या वेळेत महाआरतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येईल. (Krishna Janmashtami 2024 Wishes in Marathi: कृष्ण जन्माष्टमी मराठी शुभेच्छा, Quotes, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा यंदा गोकुळाष्टमी)
पुढील दिवसाचे वेळापत्रक (27 ऑगस्ट 2024)
भाद्रपद कृष्ण पक्षातील नवमीचा दिवस नंदोत्सव म्हणून साजरा केला जातो, जेव्हा नंद महाराजांनी प्रथमच बाळ कृष्णाकडे पाहिले, त्यामुळे संपूर्ण गोकुळ उत्सवात तल्लीन झाले. या दिवशी खाद्यपदार्थ आणि भेटवस्तूंचे स्टॉल दिवसभर खुले राहतील. मंदिराच्या सभामंडपात नेहमीच्या सकाळच्या कार्यक्रमानंतर 12.00 वाजता भोग अर्पण व महाआरती होईल. यासोबतच श्री लक्ष्मी प्रभुपादाच्या प्रकट दिनानिमित्त त्यांच्या सन्मानार्थ विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.