Husband Appreciation Day 2024 Wishes: तुमच्या पती चा आजचा दिवस खास करण्यासाठी खास रोमॅन्टिक मेसेजेस, WhatsApp Status!

आजच्या दिवसाचं तुम्ही रोमॅन्टिक सेलिब्रेशन देखील करू शकता. या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकमेकांसोबत खास आठवणी बनवू शकता.

Husband Appreciation Day । File Image

तुमच्या साथीदाराबद्दल प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्हांला रोजच संधी असते पण खास पतीवर आपलं प्रेम व्यक्त करण्याचा एक खास असतो तो तुम्हांला ठाऊक आहे का? एप्रिल महिन्यातील तिसरा शनिवार हा Husband Appreciation Day म्हणून साजरा केला जातो. हा दिवस National Husband Day किंवा World Husband Day म्हणून देखील ओळखला जातो. यंदा हा दिवस 20 एप्रिल दिवशी आहे. मग आजच्या दिवशी तुमच्या पतीवरील प्रेम व्यक्त करत त्याला शुभेच्छा देण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा तुम्ही शुभेच्छा दएत हा दिवस खास करू शकाल. त्यासाठी खालील फोटोज डाऊनलोड करून सोशल मीडीयात तुम्ही शेअर करू शकाल.

Husband Appreciation Day हा दिवस पती बद्दल कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्याचा आहे. अनेकदा त्याच्या कडून अपल्याला मिळालेल्या अनेक लहान सहान गोष्टींबद्दल आपल्याकडून विसर पडतो. त्याला या दिवसाचं औचित्य साधत एकदा थॅक्स म्हणा. त्याने कुटुंबासाठी केलेल्या त्यागाची या दिवसानिमित्त जाणीव ठेवत तुमच्या व्यस्त दिवसामधून थोडा वेळ काढा आणि त्याचा आजचा दिवस खास करा.

Husband Appreciation Day च्या शुभेच्छा

तुझ्या कुंकवाशी माझं नातं जन्मोजन्मी असावं,
मंगळसूत्र गळ्यात घालतांना तू डोळ्यात पाहून हसावं,
 कितीही संकटं आली तरी, तुझा हात माझ्या हाती असावा..
 Husband Appreciation Day च्या शुभेच्छा!
Husband Appreciation Day । File Image
चंद्राला पाहून भरती येते सागराला
तशी तुझी प्रेमाची साथ असू दे माझ्या जीवनाला
Husband Appreciation Day । File Image
 तुझं माझ्या आयुष्यात येणं
 हेच एक सुरेल गाणं आहे,
 तुझं माझं सहजीवन हे नक्षत्रांचं देणं आहे..
Husband Appreciation Day । File Image
 मला प्रेमात कधीच हरायचं आणि जिंकायचं नाही
 फक्त तुझ्यासोबत आयुष्यभर जगायचं आहे…!
Husband Appreciation Day । File Image

कुटुंब जसं मोठं होत जातं तसं तुम्हांला तुमच्या साथीदारासोबत वेळ घालवणं कमी होत जातं. मग या दिवसाचं औचित्य साधत पुन्हा तुमचं नातं मजबूत करण्यासाठी प्रयत्न करा. आजच्या दिवसाचं तुम्ही रोमॅन्टिक सेलिब्रेशन देखील करू शकता. या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकमेकांसोबत खास आठवणी बनवू शकता.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now