Holi 2019: होळी, धूळवड, रंगपंचमी 2019 आणि शिमगा यंदा नेमका कधी आहे?
यंदा होळी(Holi) 20 मार्च, धुलिवंदन (Dhulivandan) 21 मार्च आणि रंगपंचमी (Rangapanchami) 25 मार्च या दिवशी आहे.
Holi,Dhulivandan, Rang Panchami 2019 Dates: वसंताची चाहूल लागल्यानंतर वातावरणामध्येही बदल होण्यास सुरूवात होते. निसर्गात जशी रंगाची उधळण होते तशीच या दिवसांमध्ये येणार्या सणांमध्येही रंगांची, आनंदाची उधळण होते. मराठी कॅलेंडरप्रमाणे वर्षाची शेवट फाल्गुन महिन्याने (Phalguna Month) होते. या महिन्यात येणारा एक मोठा सण म्हणजे होळी. महाराष्ट्रासह देशात आणि आता जगभरात विविध स्वरूपात होळीचा सण साजरा केला जातो. फाल्गुन पौर्णिमेपासून पंचमीपर्यत विविध स्वरूपात होळी साजरी केली जाते. तर मग पहा यंदा होळी(Holi), धुलिवंदन (Dhulivandan) आणि रंगपंचमी (Rangapanchami) नेमकी कोणत्या दिवशी आहे?
होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीचा महाराष्ट्रभरातील उत्साह
होळी-
हुताशनी पौर्णिमेचा दिवस हा होळी म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे यंदा होळी बुधवार, 20 मार्च 2019 दिवशी आहे. यादिवशी संध्याकाळी होळी पेटवली जाते. होळीची पूजा करून त्याला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यादिवाशी पेटत्या होळीत मनातील सारे विनाशकारक, संहारक विचार जाळण्यासाठी प्रतिकात्मक पूजा केली जाते.Holika Dahan 2019: हुताशनी पौर्णिमा दिवशी होळी का पेटवली जाते? यंदा होलिका दहन करण्याचा मुहूर्त काय?
धूलिवंदन-
होळीचा दुसरा दिवस, 21 मार्च हा धूलिवंदन किंवा धूळवड म्हणून साजरा केला जातो. या दिवशी काही ठिकाणी पेटत्या होळीची लाकडं घरी नेऊन त्यावर पाणी पेटवून आंघोळ केली जाते. तसेच पेटत्या होळीच्या राखेने धूळवडीचं सेलिब्रेशन केलं जातं.काही ठिकाणी धूलिवंदनाच्या दिवशी रंगांनी होळी खेळली जाते. Dhulivandan 2019: धूलिवंदन सण केवळ रंगांनी नव्हे तर 'असा' साजरा केला जातो, पहा धुलिवंदनाचं महत्त्व
रंगपंचमी-
फाल्गुन पंचमी हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा केला जातो. 25 मार्च हा दिवस रंगपंचमी म्हणून साजरा केला जाईल. या दिवशी रंगाची उधळण केली जाते. पाण्याने किंवा गुलालाच्या मदतीने रंगपंचमी हा सण साजरा केला जातो. उत्तर भारतामध्ये फुलांच्या आणि नैसगिक रंगाच्या मदतीने रंगपंचमी साजरी केली जाते.
कोकणामध्ये होळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. 'शिमगा' म्हणून हा सण साजरा केला जातो. कोकणात होळीचा सण आठ दिवसांचा उत्सव असतो. यामध्ये प्रत्येक गावामध्ये स्थानिक ग्रामदेवतेची पालखी नाचवून सण साजरा केला जातो. त्यामुळे कोकणातील प्रत्येक गावामध्ये शिमग्याचा सण, त्यामधील पालखी नाचवण्याचे दिवस वेगवेगळे असतात.