World Music Day 2020 Quotes: वर्ल्ड म्युझिक डे निमित्त बॉब मार्ले ते महेश काळे यांचे विचार शेअर करून साजरा करा यंदाचा जागतिक संगीत दिन!
आज (21 जून) जागतिक संगीत दिनानिमित्त शस्त्रीय गायक पंडीत वसंतराव देशपांडे, महेश काळे (Mahesh Kale) ते बॉब मार्ले आणि प्लेटो बघा यांचे विचार व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबूक मेसेंजर (Facebook Messenger) च्या माध्यमातून ग्रीटिंग्स, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करा आणि आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
Happy World Music Day 2020: संगीत ही एक अशी कला आहे जिला कोणत्याच भाषेच, धर्माचं, जाती-पातीचं किंवा भौगोलिक सीमांचं बंधन नाही. जगात निसर्गात, प्राण्या-पक्षांमध्येही संगीत खळाळत असतं फक्त ते समजून घेण्याची क्षमता आणि त्याचा आनंद घेता आला आहे. जगातल्या सार्या संगीत प्रकार, उपप्रकारांना दाद देण्यासाठी 21 जून हा दिवस जागतिक संगीत दिन म्हणून साजरा केला जातो. देशा-पदेशात या दिवसाच्या निमित्ताने अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात. यंदा कोरोना संकटामुळे त्यावर बंधनं आली आहेत. मात्र अशा कठीण काळातही नकारत्मकता बाजुला सारून मनाला उभारी देणारं संगीतही मुबलक आहे. मग जगभरात संगीतासाठी आपलं आयुष्य वेचणार्या आणि कलेच्या या प्रकाराकडे नव्या दृष्टीकोनातून पहायला शिकवणार्या अनेक लहान-मोठ्या कलाकारांचं पहा संगीत या कलाप्रकाराबद्दल काय आहे म्हणणं? दरम्यान आज (21 जून) जागतिक संगीत दिनानिमित्त शस्त्रीय गायक पंडीत वसंतराव देशपांडे, महेश काळे (Mahesh Kale) ते बॉब मार्ले आणि प्लेटो बघा यांचे विचार व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबूक मेसेंजर (Facebook Messenger) च्या माध्यमातून ग्रीटिंग्स, HD Images, Wallpapers च्या माध्यमातून शेअर करा आणि आजच्या दिवसाचा आनंद द्विगुणित करा.
संगीत ही एक वैश्विक भाषा आहे त्यामुळे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतापासून अगदी पाश्चिमात्य संगीतापर्यंत त्याचा प्रचंड मोठा आवाका आहे. आज या संगीत दिनासिवशी अशाच काही महान कलाकारांच्या माध्यमातून त्याच्या विविध वैचारिक पैलूंबाबत नक्की जाणून घ्या.
जागतिक संगीत दिनाच्या शुभेच्छा!

- संगीत एक नैतिक कायदा आहे जो विश्वाला आत्मा देतो, मनाला पंख, कल्पनाशक्तीला उडाण आणि तर जीवनाला मोहिनी आणि प्रसन्नता देतं- प्लेटो
-
- Happy World Music Day| File Photo
- गायन केवळ मनोरंजन नाही, तर तो संगीत कलेचा स्वतंत्र विचार आहे - पं. वसंतराव देशपांडे
- Happy World Music Day| File Photo
- संगीताबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे जेव्हा ते तुम्हांला भिडतं तेव्हा वेदना होत नाही - बॉब मार्ले
Happy World Music Day| File Photo- गाणं हे चित्रासारख असत. शब्द हे त्या चित्रातील आकार असतात आणि गाण्याचा अर्थ हा आकारांमधील वेगवेगळे रंग असतात. - महेश काळे
आज काळ बदलला तसे संगीतामध्ये बदल झाले. श्रोत्यांच्या आवडी निवडीदेखील बदलल्या आहेत. आज वैद्यशास्त्र देखील संगीताकडे उपचार पद्धती म्हणून पाहत आहे. अनेक शारिरीक, मानसिक आजारांमध्ये संगीताचा प्रभावी वापर करून रूग्णाचा त्रास कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या आवडत्या गाण्यांसोबत सेलिब्रेट करा. तुमच्या आवडत्या कलाकाराला आजच्या संगीत दिनाच्या निमित्ताने कृतज्ञता व्यक्त करून त्यांच्या संगीत क्षेत्रातील योगदानालाही प्रोत्साहन द्या.
(The above story first appeared on LatestLY on Jun 21, 2020 12:02 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

