Happy World Health Day 2022 Images: जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा देत साजरा करा वर्ल्ड हेल्थ डे!

"Our Planet, Our Health" या थीम वर यंदा जागतिक आरोग्यदिन साजरा केला जाणार आहे.

World Health Day| PC: File Image

जागतिक आरोग्य दिन दरवर्षी 7 एप्रिल दिवशी साजरा केला जातो. यंदा जागतिक आरोग्य संघटनेचा 7 एप्रिल दिवशी 71 वा वर्धापन दिन या निमित्ताने साजरा केला जाणार आहे. भारतामध्ये Ministry of Ayush कडून 'Yoga Amrit Mahotsav'साजरा करत हा आरोग्य दिन अर्थात World Health Day साजरा केला जाणार आहे. मग या दिवसाचं औचित्य साधत तुमच्या प्रियजणांना यानिमित्ताने त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक रिमाईंडर WhatsApp Status, Stickers, Wishes, Messages, HD Images, GIFs द्वारा शेअर करत पाठवा. त्यासाठी लेटेस्टली मराठी टीम कडून तयार करण्यात आलेली ही ग्रिटिंग्स देखील तुम्ही पाठवू शकता.

"Our Planet, Our Health" या थीम वर यंदा जागतिक आरोग्यदिन साजरा केला जाणार आहे. मागील दोन वर्ष कोरोना संकटाचा सामना केल्यानंतर वेगात विकासाच्या मागे धावत सुटलेल्या माणसाला निसर्गाचा विसर पडत चालल्याचं सत्य आपल्याला खाडकन जागं करून गेलं आहे. त्यामुळे यंदा जागतिक आरोग्य संस्थेने आपल्या ग्रहाचं आरोग्य आणि त्यावर बेतलेलं आपलं आयुष्य या गंभीर गोष्टीकडे सार्‍यांचे लक्ष वेधून घेत आहे.

जागतिक आरोग्य दिनाच्या शुभेच्छा

World Health Day| PC: File Image
World Health Day| PC: File Image
World Health Day| PC: File Image
World Health Day| PC: File Image
World Health Day| PC: File Image

जागतिक आरोग्य दिन पहिल्यांदा 1950 मध्ये साजरा करण्यात आला. 1948 मध्ये WHO ने पहिल्यांदा जागतिक आरोग्य सभा भरवली आणि 7 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला. 1948 मध्ये हा दिवस ठरवण्यात आला असला तरी, तो 1950 मध्ये लागू झाला. युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज (UHC) कडे वाटचाल करण्यासाठी देशांकडून पाठिंबा मिळवून देण्यासाठी देखील हा दिवस महत्त्वाचा आहे.