Happy Vasant Panchami 2020 Wishes: वसंत पंचमीच्या शुभेच्छा Messages, HD Images, greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन ज्ञानदेवी सरस्वतीचा जन्मदिन करा उत्साहात साजरा
त्यामुळे ‘वागीश्वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे. अशा या मंगलमयी दिवसाच्या तशाच शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस
Happy Vasant Panchami 2020 Marathi Wishes: वसंत पर्वाचा प्रारंभ ज्या पंचमीने होतो त्याला वसंतपंचमी असे म्हणतात. याच दिवशी श्री, म्हणजे विद्येची अधिष्ठात्री देवता महासरस्वती हिचा जन्मदिन साजरा करण्यात येतो. ब्राह्मणग्रंथांनुसार वाग्देवी सरस्वती ब्रह्मस्वरूपा, कामधेनु आणि समस्त देव यांची प्रतिनिधी आहे. तीच विद्या, बुद्धी आणि ज्ञान यांची देवी आहे. अमित तेजस्विनी आणि अनंत गुणशालिनी देवी सरस्वतीची पूजा अन् आराधना यांसाठी माघ मासातील (महिन्यातील) पंचमी ही तिथी निश्चित केली गेली आहे. वसंतपंचमीला तिचा आविर्भाव दिवस मानला जातो. त्यामुळे ‘वागीश्वरी जयंती’ आणि ‘श्रीपंचमी’ या नावानेही ही तिथी प्रसिद्ध आहे.
वसंतपंचमीपासून फाल्गुन पौर्णिमेपर्यंत वसंतोत्सव साजरा करतात. प्राचीन काही वसंत ॠतूच्या आगमनाप्रीत्यर्थ सुवसंतक, वसंतोत्सव, मदनोत्सव, अशोकोत्सव वगैरे उत्सव करण्याची प्रथा होती. या निमित्ताने नृत्य, संगीत, वनविहार, जलक्रीडा इ. मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जाते. अशा या मंगलमयी दिवसाच्या तशाच शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळे मेसेजेस:
हेदेखील वाचा- Vasant Panchami 2020: जाणून घ्या का साजरी केली जाते वसंत पंचमी; उत्सवाचे महत्व, पूजाविधी आणि मुहूर्त
वसंतपंचमी हा सर्व प्रकारच्या शुभकार्यांसाठी अत्यंत शुभमुहूर्त मानला गेला आहे. यांत प्रामुख्याने नवी विद्याप्राप्ती आणि गृहप्रवेश यांसाठी वसंतपंचमीला पुराणांतही अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. अशा या शुभ दिवसाच्या लेटेस्टली मराठी कडून सर्वांना हार्दिक शुभेच्छा