Happy Shravan Maas Wishes: श्रावण मासारंभाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रीटींग्स, शुभेच्छापत्रं!
यंदा महाराष्ट्रात 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान श्रावणमास असणार आहे. या श्रावणमासाच्या शुभेच्छा देत मंगलमय सुरूवात करण्यासाठी मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा.
हिंदू धर्मीयांसाठी अत्यंत पवित्र असलेल्या 'श्रावण' (Shravan) महिन्याची आज 13 ऑगस्ट 2026 पासून महाराष्ट्रात सुरूवात झाली आहे. सण आणि व्रत वैकल्यांनी सजलेला हा महिना निसर्गाप्रमाणेच महाराष्ट्रातील घरा घरांमध्येही नवचैतन्य घेऊन येतो. सणांच्या निमित्ताने गोडाधोडाच्या पदार्थांची रेलचेल ते अगदी सण, पूजा अर्चा यांची रेलचेल सुरू होणार आहे. मग अशा या मंगलमय श्रावण मासाच्या शुभेच्छा देत या नव्या महिन्याची सुरूवात अत्यंत भक्तीमय मार्गाने करण्यासाठी WhatsApp Status, Facebook, Instagram Messages शेअर करत या श्रावणमासाच्या शुभेच्छा शेअर करायला विसरू नका.
श्रावण महिना हा भगवान शंकराच्या उपासनेचा महिना आहे. म्हणून या महिन्यात शिवभक्ती, उपवास आणि पूजा-अर्चा यांना विशेष महत्त्व आहे.श्रावण महिन्याच्या प्रत्येक सोमवारी शिवमूठ अर्पण केली जाते. नागपंचमी, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी (कृष्ण जन्माष्टमी),पिठोरी अमावस्या सारखे महत्त्वाचे सण साजरे केले जातात. श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचं व्रत तर शुक्रवारी जरा जिवंतिका पूजन केले जाते. नक्की वाचा: Shravan Somvar Vrat 2026 Dates: 13 ऑगस्ट पासून श्रावणमासारंभ; पहा श्रावणी सोमवार व्रत तारखा.
श्रावण महिन्याच्या शुभेच्छा
महाराष्ट्रात अमांत चांद्र कॅलेंडर पाळलं जात असल्याने उत्तर भारताच्या तुलनेत महाराष्ट्रात 15 दिवसांनंतर श्रावण मासाची सुरूवात होते. यंदा महाराष्ट्रात 13 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर 2026 दरम्यान श्रावणमास असणार आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 13, 2026 11:05 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

