
Happy Rose Day 2021: आजपासून व्हेलेंटाईन वीक (Valentine's Week) ला सुरूवात झाली आहे. 7 ते 14 फेब्रुवारी दरम्यान प्रेमात बुडलेली जोडपं गुलाबापासून अगदी चॉकलेट, टेडी, हग आणि किस डे असे सात वेगवेगळे दिवस सेलिब्रेट करून आपला व्हेलेंटाईन वीक साजरा करत प्रेम व्यक्त करतात. दरवर्षी 7 फेब्रुवारीला रोज डे साजरा करत या दिवसाची सुरूवात होते. मग आज तुमच्या साथीदाराला देखील रोज डे च्या शुभेच्छा देण्यासाठी काही HD Images, Greetings देण्याच्या विचारात असाल तर लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली रोझ डे (Rose Day) स्पेशल मराठमोळी ग्रीटिंग्स, वॉलपेपर्स शेअर करत तुमच्या साथीसोबतच्या यंदाच्या सेलिब्रेशनला थोडं खास बनवायला विसरू नका. Happy Rose Day Wishes In Marathi: रोज डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा देत Valentine's Week ची करा रोमॅन्टिक सुरूवात!
आजकाल सोशल मीडिया आणि इंटरनेट मुळे जग अवघ्या एका क्लिकवर आलं आहे. मग सोशल मीडियात व्हॉट्सअॅप स्टिकर्स, स्टेट्स, मेसेजेस द्वारा यंदाच्या रोझ डे च्या शुभेच्छा शेअर करत दिवसाची सुरूवात नक्कीच करू शकता. 'रोझ डे'च्या दिवशी कोणत्या रंगाचं गुलाब तुमच्या मनातील कोणती भावना व्यक्त करते?
रोझ डे 2021 HD Images






रोझ डे ही व्हेलेंटाईन वीक ची सुरूवात आहे. गुलाबाच्या फूलाच्या माध्यमातून प्रेम व्यक्त करण्याची प्रथा फार जुनी आहे. फेब्रुवारीचा महिना उजाडला की आपोआपच प्रेमवीरांमध्ये त्यांच्या साथीदारासोबत 7 ते 14 फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन वीक साजरा करण्यासाठी विविध प्लॅन्स शिजू लागतात. यंदा या वेलेंटाईन वीकच्या निमिताने तुम्ही काय प्लॅन केले आहेत ते देखील आम्हांला नक्की सांगा