Happy Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाच्या मराठमोळ्या शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रीटिंग्स, Facebook Messages आणि Quotes!
रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते म्हणजेच 'संरक्षणाचे नाते' याचा संदेश देणारा हा सण आहे. मग तुमच्या भावंडांसोबत हा सण आनंदात साजरा करण्यासाठी शुभेच्छापत्र नक्की शेअर करा.
रक्षाबंधन (Raksha Bandhan) हा सण आपल्याला नात्यांचे महत्त्व शिकवतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात हा सण भाऊ-बहिणींना एकत्र येण्याची आणि आपले प्रेम व्यक्त करण्याची संधी देतो. श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जाणारा रक्षाबंधनाचा सण 28 ऑगस्ट दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी तसेच सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करते. भाऊ आपल्या बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देतो आणि तिला भेटवस्तू देऊन तिच्यावरील प्रेम व्यक्त करतो. मग असा हा प्रेमाचा दिवस आनंदाने साजरा करण्यासाठी एकमेकांना WhatsApp Status, Quotes, Wishes, Messages च्या माध्यमातून शुभेच्छा देतही साजरा करू शकता.
राखीच्या धाग्यामध्ये विश्वास, प्रेम आणि जबाबदारीची भावना असते. रक्षा म्हणजे संरक्षण आणि बंधन म्हणजे नाते म्हणजेच 'संरक्षणाचे नाते' याचा संदेश देणारा हा सण आहे. . शुक्रवार 28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजून 47 मिनिटांपर्यंत जरी श्रावण पौर्णिमा असली तरी रक्षाबंधन सण संपूर्ण दिवसभर साजरा करायचा आहे. रक्षाबंधनासाठी संपूर्ण दिवस शुभ आहे असे पंचांगकर्ते, खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यांनी सांगितले आहे.
रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
राखीच्या धाग्यात प्रेम असो,
भावाच्या मनात बहिणीसाठी माया असो.
दोघांच्याही आयुष्यात
सुख-समृद्धीची बरसात असो.
सोबत आहे तुझी खास…
जन्मोजन्मी असाच राहो,
भावा-बहिणीच्या नात्याचा सहवास
नातं आपलं शब्दांपलीकडचं,
प्रेम आपलं मनापासूनचं…
कितीही अंतर असलं तरी,
मनाने आपण कायम जवळ असू.
प्रेमाची आठवण करून देईल.
आपल्या नात्यातला गोडवा
असाच आयुष्यभर टिकून राहील.
आपलं नातं असंच हसत राहो.
सुख-दुःखाच्या प्रत्येक क्षणी,
एकमेकांची साथ कायम राहो.
रक्षाबंधन हा सण आपल्याला हे शिकवतो की संरक्षण आणि काळजी घेणे हे फक्त भावानेच बहिणीसाठी करायचे नसते, तर एकमेकांप्रती आदर आणि जबाबदारीची भावना असणे महत्त्वाचे आहे. आजकाल अनेक बहिणीही आपल्या भावांचे रक्षण करण्याची जबाबदारी घेतात, त्यामुळे हा सण समानतेचाही संदेश देतो.