New Year 2021 Images: नवीन वर्षाच्या निमित्ताने मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या सर्वांना शुभेच्छा!

Happy New Year 2021 HD Images:  2020 हे वर्ष संपूर्ण जगभरातील लोकांसाठी फारसे चांगले गेलेले नाही. यावर्षी चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. तसेच कितीही ठरवले तरी 2020 मधील कटू आठवणी विसरू आपल्याला विसरता येणार नाहीत. त्यामुळे 2020 हे सर्वात वाईट वर्ष होते, असे अनेकांनी जाहीरच केले होते. याशिवाय, हे 2020 वर्ष कधी संपणार? याची वाटही पाहात होते. नवीन वर्ष चांगले जाईल, अशी लोकांची 2021 कडून अपेक्षा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराबाहेर पडता येणार नसले तरी, खालील एचडी एमेजच्या माध्यमातून तुम्ही आपल्या नातेवाईकांना आणि मित्रांना शुभेच्छा देऊ शकतात.

नववर्ष म्हणजे नवे संकल्प, नवे विचार, नवा उत्साह, नवे ध्येय घेऊन येणारा. नवीन वर्षाच्या पहिला दिवस हा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी असतो. कारण, नवीन वर्षातला पहिला तुमचे येणारे वर्ष कसे जाईल हे ठरवतो, असा अनेकांचा समज आहे. यामुळे प्रत्येकजण नवीन वर्षाचा पहिला दिवस आनंदात घालवतात. हे देखील वाचा- Christmas 2020 Images: क्रिसमस सणानिमित्त HD Wallpapers, Wishes, Messages तुमच्या मित्रपरिवाराला पाठवून साजरा करा नाताळचा सण

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा-

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा-

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा-

नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा- 

संपूर्ण देशात नव्या वर्षाचे मोठ्या उत्साहाने आणि जल्लोषात साजरा केला जातो. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्यात नव्या कोरोना विषाणूचा वाढलेला धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने नववर्षाच्या निमित्ताने महत्वाच्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. राज्यातील नागरिकांनी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नववर्षाचे स्वागत करणाच्या निमित्ताने घरा बाहेर पडू नये. तसेच कोरोनाचे संकट टळलेले नसून नववर्षाचे स्वागच घरीच साधेपणाने साजरे करावे, असे राज्य सरकारने जारी केलेल्या गाइडलाइन्समध्ये नमूद करण्यात आले होते.