Happy Narali Purnima: नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देणारी मराठमोळी ग्रीटिंग्स, WhatsApp Status, Messages !

महाराष्ट्रातील किनारपट्टी भागात श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा नारळी पौर्णिमा हा सण कोळी समाजासाठी केवळ धार्मिक उत्सव नसून, त्यांच्या जीवनशैलीशी थेट निगडित असा महत्त्वाचा दिवस आहे.

Narali Poornima

भारतीय सणांमध्ये केवळ धार्मिक उत्सव नसतो तर त्यासोबतच निर्सगाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची देखील भावना असते. नारळी पौर्णिमा (Narali Purnima) हा असाच एक सण आहे. श्रावण पौर्णिमेच्या दिवशी साजरी केली जाणारी नारळी पौर्णिमा ही कोळी बांधवांसाठी विशेष महत्त्वाची असते.नारळी पौर्णिमेला समुद्राचा अधिपती मानल्या जाणाऱ्या वरुण देवतेची पूजा केली जाते. समुद्रकिनारी जाऊन नारळ अर्पण करणे हा या पूजेचा मध्यवर्ती विधी आहे. मग आज कोळी बांधवांच्या या सणामध्ये सहभागी होत त्यांना नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा देण्यासाठी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं,Messages, Quotes, WhatsApp Status शेअर करून त्यांचा आजचा सण खास करा.

नारळी पौर्णिमा हा सण प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा सण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या परंपरेचा भाग असून, आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने साजरा केला जातो.  नक्की वाचा: Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला यंदा 5 तासांहून अधिक काळाचे चंद्रग्रहण, राखीचा सण साजरा करता येणार का? 

नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

Narali Poornima
Narali Poornima
Narali Poornima

 

पावसाळ्याच्या काळात समुद्र खवळलेला असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव मासेमारीवर बंदी असते. नारळी पौर्णिमेनंतर समुद्र तुलनेने शांत होऊ लागतो आणि याच दिवसापासून मासेमारीचा हंगाम औपचारिकरित्या पुन्हा सुरू होतो. त्यामुळे कोळी बांधवांसाठी हा सण नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात मानला जातो. बोटी सजवून त्यांचीही पूजा केली जाते, जेणेकरून पुढील हंगामात चांगली मासळी मिळावी ही कामना केली जाते.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement