Hug Day 2020 Gift Ideas: यावर्षीच्या 'हग डे'ला प्रेमळ आलिंगनासोबत जोडीदाराला द्या खास गिफ्ट; 'असा' साजरा करा प्रेमाचा आठवडा
दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमात असलेले लोक व्हॅलेंटाईन डेची (Valentine's Day) वाट पाहत असतात.
7 फेब्रुवारी रोजी 'रोझ डे' (Rose Day) पासून प्रारंभ होणारा व्हॅलेंटाईन वीक (Valentine's Week 2020) हा जोडप्यांसाठी एखाद्या उत्सवापेक्षा कमी नाही. दरवर्षी फेब्रुवारी महिना सुरू होताच प्रेमात असलेले लोक व्हॅलेंटाईन डेची (Valentine's Day) वाट पाहत असतात. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, परंतु त्यापूर्वीचा संपूर्ण आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरी करण्याची प्रथा आहे.
या आठवड्याची सुरुवात होते रोझ डेने त्यानंतर प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे, किस डे आणि अखेर व्हॅलेंटाईन डे, असा हा संपूर्ण वीक साजरा केला जातो. 12 फेब्रुवारी रोजी हग डे साजरा केला जाईल.
आपल्या जोडीदाराला एक प्रेमाचे आलिंगन देऊन तुम्ही या दिवसाची सुरुवात करा. मात्र त्यानंतर आपल्या जोडीदाराला खुश करण्यासाठी तसेच हा स्पेशल दिवस साजरा करण्यासाठी एखादे छानसे गिफ्ट नक्की द्या. आज आम्ही अशाच काही गिफ्ट आयडीयाजबद्दल माहिती देणार आहोत.
अम्युझमेंट पार्क (Amusement Park) - अनेक लोक अम्युझमेंट पार्कमधील साहसी खेळांना प्रचंड घाबरतात. त्यामुळे या हग डे दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला अम्युझमेंट पार्कमध्ये घेऊन जाऊ शकता. यातील प्रत्येक राईड तुम्ही तुमच्या पार्टनरला आलिंगन देऊन अनभवू शकता, जेणेकरून तुम्ही शरीराने एकत्र असाल आणि अशा धाडसी राईडचा आनंदही घ्याल.
खास तयार करून घेतलेली उशी - बऱ्याच जणांना आपल्या जोडीदाराला मिठी मारून झोपण्याची सवय असते. मात्र जोडीदार सोबत नसेल तर? अशावेळी उपयोगी पडेल म्हणून 'हग डे'ला तुम्ही एक खास तयार करून घेतली उशी आपल्या जोडीदाराला भेट म्हणून देऊ शकता. यामधील कापूस, कपडा आपल्या जोडीदाराच्या आवडीचा निवडा. तसेच त्याच्यावर तुम्हा दोघांचा एखादा छानसा फोटो प्रिंट करून घेऊ शकता.
स्कीन केअर उत्पादने - प्रत्येक व्यक्तीच्या शरीराचा स्वतःचा असा एक सुगंध असतो. आपल्या जोडीदाराचे आजूबाजूला आगमन झाले हे त्याच्या वासावरून कळते. त्याला आलिंगन दिल्यावर तर हा वास त्याची आठवण बनून मनात कोरला जातो. त्यामुळे यंदाच्या 'हग डे'ला तुम्ही तुमच्या जोडीदाराला स्कीन केअर उत्पादने किंवा परफ्युम अशा गोष्टी गिफ्ट करू शकता, जेणेकरून प्रत्येक आलिंगनासोबत येणाऱ्या सुगंधामुळे तुमचे नाते बहरत राहो. (हेही वाचा: Valentine Week 2020: व्हॅलेंटाईन विकमधील प्रत्येक दिवसाचं काय आहे महत्त्व? का साजरा करतात रोज, प्रपोज, चॉकलेट, टेडी, प्रॉमिस, हग, किस डे?)
खास डिनर - अनेकवेळा कामाच्या घाई गडबडीत दोघांनी एकत्र काही सुखाचे क्षण व्यतीत करणे राहून जाते. यंदा 'हग डे'ला ही कसर पूर्ण करा, आपल्या जोडीदाराला एक खास डिनरला घेऊन जा. शक्यतो असे एखादे ठिकाण निवडा जिथे सॉफ्ट संगीत असेल आणि तुम्ही एकत्र नृत्यही करू शकाल, जेणेकरून आपल्या जोडीदाराला आलिंगन देऊन डान्स करण्याचा आनंद तुम्ही घेऊ शकाल.
मात्र लक्षात घ्या, 'हग डे'साठी आपली सर्वात मोठी भेटवस्तू ही तुमचे प्रेमळ आलिंगनच ठरू शकेल. आपल्या मानसिक आरोग्यासाठीही मिठी मारणे फायदेशीर असते. जोडीदाराला मारलेली मिठी ही आपला त्याच्यावरील विश्वास वाढवतो, आपले नाते अजून घट्ट होते. त्यामुळे यादिवशी अशी अनेक कारणे जाणूनबुजून शोधून काढा, जेणेकरून वारंवार तुम्ही तुमच्या जोडीदाराला आलिंगन देऊ शकाल.