Happy Hug Day 2019: 'हग डे'च्या दिवशी ही Romantic Greetings, GIF Images,WhatsApp Messages,SMS शेअर करून साथीदाराला द्या जादूची झप्पी

या दिवशी ज्या भावना शब्दांत मांडता येत नाही त्या घट्ट मिठीतून मांडण्याचा दिवस.

Happy Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

Valentine’s Day 2019:  व्हेलेंटाईन वीक (Valentine Week) सेलिब्रेशनमधील सहावा दिवस म्हणजे हग डे. या दिवशी ज्या भावना शब्दांत मांडता येत नाही त्या घट्ट मिठीतून मांडण्याचा दिवस. 12 फेब्रुवारी हा दिवस हग डे (Hug Day 2019) म्हणून साजरा केला जातो. जसजसा व्हेलेंटाईन डे (Valentine’s Day)  जवळ येत आहे तशी प्रेमी युगुलांमध्ये तो दिवस खास बनवण्यासाठी प्लॅन सुरू आहेत. हग डे (Hug Day )  या दिवशी तुमच्या प्रिय व्यक्तीला मिठीत घेऊन तुमचं प्रेम व्यक्त करायचं असतं. काहीवेळेस जे शब्दांत बोलता येत नाही ते अशा लहान लहान कृतींमधून अधिक मोकळेपणाने व्यक्त करता येतं.Valentine’s Day 2019: Rose Day ते Valentine’s Day पहा कसं असेल हे आठवड्याभराचं Romantic सेलिब्रेशन

तुमची प्रिय व्यक्ती तुमच्यासोबत असेल तर तिला किंवा त्याला आज भेटून घट्ट मिठी मारा. यामधून कळत नकळत अनेक अव्यक्त भावना मोकळ्या होतील पण जर तुम्ही लॉंग डिस्टंट रिलेशनशिपमध्ये असाल तर समोरच्या व्यक्तीपर्यत तुमच्या यंदाच्या Hug Day च्या शुभेच्छा पोहचवण्यासाठी व्हॅच्युअल मीडिया, ऑनलाईन ग्रिटिंग्स, खास संदेश यांची मदत घ्यावी लागेल. मग यंदा तुमच्या मदतीला हे मेसेज नक्की येतील..

Hug Day 2019 मेसेज, ग्रिटिंग्स

प्रेम माझ तुझ्यावरचं कोणत्याच शब्दात मावणार नाही

तुला मिठीत घेताच कळत, आता त्याचीही गरज भासणार नाही

Happy Hug Day

Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

मिठीत तुझ्या असताना

वेळेनेही थोडं थांबावं,

क्षणभंगुर त्या क्षणांना तेव्हा दीर्घायुष्य लाभावं!

Happy Hug Day

Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

बर्फासारख्या या थंडीमध्ये तुझ्या मिठीत विसावसं वाटतं

एका जन्माचं आयुष्य एका क्षणात जगावसं वाटतं

Happy Hug Day

Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

तुझ्या मिठीत मला  सामावून घे

कोवळी मिठी अजून घट्ट होऊ दे

श्वासही आपले एक होऊ दे

बावरे मन तुझ्यात गुंतू दे

कोवळी कळी नव्याने उमलू दे

Happy Hug Day

Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

कळत नाही काय होत तुझ्यात मिठीत शिरल्यावर

आयुष्य तिथंच थांबतं तुझ्या डोळ्यात पाहिल्यावर

Happy Hug Day

Hug Day 2019 (Photo Credits: File Photo)

Hug Day 2019 GIF Images

via GIPHY

via GIPHY

via GIPHY

 

संत व्हेलेंटाईन यांच्या स्मृतिप्रित्यर्थ जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जातो. यासिवशी प्रेम करणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या साथीदाराचा दिवस थोडा स्पेशल करण्यासाठी प्रयत्न करत असते. मग यंदा तुमचा व्हेलेंटाईन डे चा प्लॅन ठरला का?