Happy Gatari 2022 Wishes: गटारीच्या शुभेच्छा, Quotes, Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करत मांसाहार प्रेमींना द्या खास शुभेच्छा
त्या तुम्ही तुमच्या मांसाहर प्रेमी मित्रांबरोबर या मजेशीर शुभेच्छा नक्कीचं शेअर करु शकता.
गटारी अमावस्या (Gatari Amavasya) मांसाहार प्रेमींसाठी (Non Veg Lover) खास दिवस आहे. या दिवशी खाण्यापिण्याची चंगळमंगळ असते. गटारी अमावस्या म्हणजे मांसाहार करण्याचा अंतीम दिवस अशी समज आहे. कारण अमावस्येनंतर लगेच दुसऱ्याचं दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते. श्रावण महिन्याला (Shravan Month) हिंदू धर्मात (Hindu Religion) विशेष महत्व आहे. हा महिना भगवान शंकराचा महिना अशी आख्यायिका आहे. तर या महिन्यात दर श्रावण सोमवारी (Shravan Monday) भगवान शंकराची (Lord Shiva) विशेष पुजा केली जाते. श्रावण महिन्यात बरीचं लोक मासंहार करणं टाळतात म्हणूनच श्रावणाची सुरुवात होण्यापूर्वी अमावस्येला मांसहार करुन मांसाहार प्रेमी गटारी साजरी करतात.गटारी निमित्त तुम्ही तुमच्या ज्या मांसाहार प्रेमी मित्रांना भेटू शकत नाही अशांना सोशल मिडीयाच्या (Social Media) माध्यमातून नक्कीचं शुभेच्छा देवू शकता. गटारी निमित्त काही खास डिजिटल (Digital) शुभेच्छा आम्ही तुमच्यासाठी घेवून आलो आहे. त्या तुम्ही तुमच्या मांसाहर प्रेमी मित्रांबरोबर या मजेशीर शुभेच्छा नक्कीचं शेअर करु शकता.
- गटारीच्या चकणाभर शुभेच्छा
2. गटारीच्या क्वार्टरभर शुभेच्छा
3. गटारीच्या खुप खुप शुभेच्छा
4. गटारीच्या स्पेशल पार्टीसाठी शुभेच्छा
5. गटारी अमावस्येच्या हार्दीक शुभेच्छा