Happy Eye Donation Day 2021 Wishes: जागतिक नेत्रदान दिनानिमित्त पाठवा हे विशेष Greetings, Whatsapp Stickers
जागतिक नेत्रदान दिन 2021 (Photo Credits ANI)

Happy Eye Donation Day 2021 Wishes: मृत्यूनंतर डोळे (Eyes) दान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी दरवर्षी 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. डोळे ही सजीवांना मिळालेली सर्वात मोठी देणगी आहे. मात्र, काही जण त्याच्यापासून वंचित राहतात. त्यामुळे आजचा हा दिवस दृष्टीदोष (Visually Impaired) आणि अंधत्व (Blindness) याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी देखील साजरा केला जातो. भारतात 1.5 लाखाहून अधिक लोकांना कॉर्नियल अंधत्व आहे, त्यापैकी 80% प्रकरणे प्रतिबंधित आहेत. कॉर्नियल ट्रान्सप्लांटद्वारे कॉर्नियल अंधत्वावर उपचार केले जाऊ शकतात, तर कॉर्निया देणगीच्या अभावी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागते. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त आम्ही देशात नेत्रदानाच्या गरजेवर प्रकाश टाकण्याचा छोटासा प्रयत्न करत आहोत.

नेत्रदानाचे महत्त्व जाणून देण्यासाठी जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 10 जून रोजी जागतिक नेत्रदान दिन साजरा केला जातो. यंदा या विशेष प्रसंगी आपणास देशातील नेत्रदातांच्या गरजेवर प्रकाश टाकण्याची आवश्यकता आहे. जागतिक नेत्रदान दिनानिमित्त जनजागृती करण्यासाठी आपण लोकांना शुभेच्छा संदेश पाठवून जनजागृती करू शकतात.

नेत्रदान दिन 2021 च्या शुभेच्छा

विश्व नेत्रदानाच्या शुभेच्छा

जागतिक नेत्रदान दिन 2021 च्या शुभेच्छा

जागतिक नेत्रदान दिनाच्या शुभेच्छा

जागतिक नेत्रदान दिनाच्या शुभेच्छा

जागतिक नेत्रदान दिवस

नेत्रदान श्रेष्ठ दान मानले जाते. आय बॅन्ड असोसिएशन ऑफ इंडियाच्या मते, नेत्रदान करू इच्छित असलेल्या व्यक्तीस प्रतिज्ञा फॉर्म भरावा लागेल आणि जवळच्या नेत्रदान बँकेत पाठवावा लागेल. आणि आपला फॉर्मची योग्यप्रकारे तपासणी केल्यांनतर ते आपली नेत्रदाता म्हणून नोंदणी करतील. आपल्याला नेत्रदान कार्ड प्रदान करून सर्व तपशील कळवला जाईल. दरम्यान, आमच्या सर्वांकडून तुम्हा सर्वांना नेत्रदान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!