Happy Engineer's Day 2021 Wishes: इंजिनियर्स डे च्या शुभेच्छा WhatsApp Status, HD Images द्वारा शेअर करत भारतीय अभियंतांना द्या शुभेच्छा

Happy Engineer's Day 2021 मेसेजेस, शुभेच्छापत्र आज इंजिनिअर मित्रमंडळींसोबत शेअर करत साजरा करा आजचा अभियंता दिवस.

Happy Engineer's Day | File Image

15 सप्टेंबर हा दिवस इंजिनियर्स डे (Engineer's Day) म्हणजेच अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya) यांचा जन्मदिवस म्हणून या दिवशी देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा वाटा असणार्‍या अभियंतांच्या मेहनतीच्या सन्मानार्थ या दिवसाला विशेष महत्त्व आहे. कन्स्ट्रकशन, प्लॅनिंग ते डिझायनिंग अशा विविध क्षेत्रामध्ये इंजिनियर्स काम करत असतात. मग तुमचे देखील मित्रमंडळ, नातेवाईक, प्रियजण या क्षेत्राशी निगडीत असतील तर त्यांच्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही खास Happy Engineer's Day ची शुभेच्छापत्र तुम्ही सोशल मीडीयामध्ये फेसबूक मेसेजेस, व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस, Wishes, Quotes, HD Images, Wallpapers यांच्या माध्यमातून शेअर करून त्यांचा आजचा दिवस देखील खास करू शकता.

आजकाल जगभरात व्हॉट्सअ‍ॅप हे मेसेजिंग अ‍ॅप लोकप्रिय झालं आहे. यामध्ये असलेल्या भन्नाट स्टिकर्सच्या माध्यमातूनही तुम्ही Engineers Day च्या शुभेच्छा देऊ शकता. त्यासाठी प्ले स्टोअर वरून स्टिकर्स डाऊनलोड करता येऊ शकतात. नक्की वाचा: Engineers Day 2021 in India: भारतात कधी आणि का साजरा केला जातो अभियंता दिन? जाणून घ्या या दिवसाची संपूर्ण माहिती.

हॅप्पी इंजिनियर्स डे 2021

Happy Engineer's Day | File Image
Happy Engineer's Day | File Image
Happy Engineer's Day | File Image
Happy Engineer's Day | File Image
Happy Engineer's Day | File Image
Happy Engineer's Day | File Image

आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया (Sir Mokshagundam Visvesvaraya)यांचा मोलाचा वाटा आहे. देशभरात बांधलेल्या अनेक नद्यांची धरणे आणि पूल यशस्वी करण्यात विश्वेश्वरय्या यांचे व्हिजन होते. म्हैसूरमधील कृष्णराज सागर धरण, पुण्यात खडकवासला जलाशय आणि ग्वाल्हेरमधील तिग्रा धरण यामागे त्यांची मेहनत आहे. भारत सरकारने 1968 मध्ये डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतींचं औचित्य साधत त्यांना सलाम म्हणून 15 सप्टेंबर हा दिवस 'अभियंता दिन' म्हणून घोषित केला.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif