Happy Diwali Padwa 2024 Messages: दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा WhatsApp Status, Quotes द्वारा देत साजरा करा सण बलिप्रतिपदेचा

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून या दिवशी सोने खरेदी केली जाते, सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा हा पहिला दिवस असल्याने त्याच्याबद्दल विशेष आकर्षण असते.

दिवाळीच्या दिवसांमध्ये कार्तिक शुद्ध प्रतिपदेचा दिवस हा बलिप्रतिपदा म्हणजेच दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. हा दिवाळी पाडवा यंदा 2 नोव्हेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. हिंदू धर्मीयांच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक हा दिवाळी पाडवा असल्याने या दिवशी विशेष सेलिब्रेशन केले जाते.मग अशा या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या कुटुंबियांना, नातेवाईकांना, मित्र मंडळींना देऊन हा दिवस साजरा करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages, Quotes, Greetings शेअर करत हा आनंदाचा दिवस साजरा करा.

नवविवाहित दांपत्यासाठी पहिला दिवाळसण अगदी खास असतो. दिवाळीचे एकत्र सेलिब्रेशन, पाडव्या निमित्त ओवाळणी, गिफ्ट्स यामुळे सणांचे हे दिवस खूपच आनंदाचे आणि उत्साहाचे असतात. या दिवशी पतीला उटणं लावून अभ्यंगस्नानाची देखील पद्धत आहे. Diwali 2024 Rangoli Designs: दिवाळीसणानिमित्त काढता येतील अशा आकर्षक रांगोळी डिझाईन, येथे पाहा व्हिडीओ .

दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा

 

दिवाळी पाडवा । File Image
सोन्यासारख्या लोकांसाठी खास
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळी पाडवा । File Image

स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
प्रार्थना आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
दिवाळी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

दिवाळी पाडवा । File Image

दिव्याच्या तेजाने आसमंत उजळू दे,
 सोनपावलांनी सुखसमृद्धी येऊ दे
 दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी पाडवा । File Image

साडेतीन मुहूर्ताचे वलय आहे!
उत्तम दिनाचे महात्म्य आहे!
सुखद ठरो हा दिवाळी पाडवा,
त्यात असूदे अवीट गोडवा!

दिवाळी पाडवा । File Image

उटण्याचा नाजूक सुगंध घेऊन आली आज दिवाळी
पणतीतल्या दिव्याच्या तेजानी उजळेल आयुष्याची वहिवाट
दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा!

दिवाळी पाडव्याचे औचित्य साधून या दिवशी सोने खरेदी केली जाते, सुवासिनींकडून पतीला औक्षण केले जाते, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा हा पहिला दिवस असल्याने त्याच्याबद्दल विशेष आकर्षण असते. या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन उदार बळीराजाला जमिनीत म्हणजे पाताळात गाडले होते अशी देखील अख्यायिका आहे.