Happy Diwali 2023 HD Images: दिवाळी निमित्त शुभेच्छा देण्यासाठी HD Images, Wallpapers, Greetings, साजरा करा दिव्यांचा उत्सव

दिवाळी निमित्त केवळ धार्मीक कार्यच केले जात नाही. तर दिवाळी फराळ म्हणजेच मिठाई फस्त केली जाते. सोबतच एकमेकांना शुभेच्छाही (Happy Diwali 2023) दिल्या जातात. अशा या खास वेळी आपणही डीजिटल मीडियाचा आधार घेत फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स यांसारख्या विविध माध्यमांचा आधार घेत  HD Images, Wallpapers, Greetings शेअर करुन आपण आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देऊ शकता.

Happy Diwali 2023 HD Wallpapers: हिंदू संस्कृतीत दिवाळी सणाला खूप महत्त्व आहे. कारण ती अंधारावर प्रकाशाचा आणि वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवते, असे मानले जाते. दिवाळी म्हणजे लोकांसाठी त्यांची घरे आणि अंतःकरणे स्वच्छ करण्याची, परस्परांबद्दल असलेला द्वेश सोडण्यासाठी आणि आयुष्याची नव्याने सुरुवात करण्याचा क्षण म्हणूनही दिवाळीकडे पाहिले जाते. दिवाळीमध्ये कुटुंबे एकत्र येतात, भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात आणि धर्माीक कार्य करतात. अशा या खास वेळी केवळ धार्मीक कार्यच केले जात नाही. तर दिवाळी फराळ म्हणजेच मिठाई फस्त केली जाते. सोबतच एकमेकांना शुभेच्छाही (Happy Diwali 2023) दिल्या जातात. अशा या खास वेळी आपणही डीजिटल मीडियाचा आधार घेत फेसबुक, इन्स्टाग्राम, एक्स यांसारख्या विविध माध्यमांचा आधार घेत  HD Images, Wallpapers, Greetings शेअर करुन आपण आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा देऊ शकता.

भारतीय संस्कृतीमध्ये खोलवर रुजलेली पाळेमुळे असलेला सण म्हणजे दिवाळी. जो वसूबारसेपासून सुरु होतो आणि पुढे भाऊबीजेपर्यंत चालतो. सर्वसाधारणपणे हा दिवस पाच दिवस चालतो. कधी कधी तिथी आणि तारखांनुसार अर्थातच पंचांगानुसार त्यात बदल संभवतो. (हेही वाचा, Laxmi Pujan Muhurat 2023: 12 नोव्हेंबरच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन कधी करावं? पहा मुहूर्ताची वेळ)

या सणाचे मूळ भारतातील प्राचीन ग्रंथ आणि दंतकथांमध्ये आढळते. रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्येत परतले तो दिवस दिवाळी म्हणून मानला जातो.

अयोध्येतील लोकांनी, भगवान राम परतल्यामुळे आनंदित होऊन त्यांच्या आगमन मार्गावर पहिल्यांदा उजळण्यासाठी दिवे लावले. तेव्हापासून अशा प्रकारे दिवाळीच्या वेळी दिवे लावण्याची परंपरा सुरु झाली असे मानले जाते.

दिवाळीच्या काळात सर्वत्र आनंदाचे वातावरण असते. लोक घरांसमोर पणत्या आणि दिवे लावतात. अंगणात रांगोळी घालतात. आकाशात आकाश कंदील लावतात.

इतकेच नव्हे तर घरामध्ये लाडू, चकली, करंजी, चिवडा, शंकरपाळे, अनारसे यांसारखे गोडाधोडाचे विविध पदार्थ बनवले जातात. या पदार्थांचा फराळ करायचा आणि फटाक्यांची आतषबाजी करायची असा एक कार्यक्रमच घराघरांमध्ये पाहायला मिळतो.

खास करुन लहान मुले दिवाळीचा आनंद विशेष प्रेमाने आणि उत्साहाने साजरा करतात. त्यामध्ये घरातील मोठी माणसेही सहभागी होतात.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement