Happy Ambedkar Jayanti 2020 Wishes: भीम जयंतीच्या शुभेच्छा मराठी Messages, WhatsApp Stickers च्या माध्यमातून शेअर करून साजरा करा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस!
बाबासाहेब आंबेडकर यांच्या 129 व्या जन्मदिवसाचं औचित्य साधून भीम अनुयायींना आंबेदकर जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठमोळी ग्रीटींग्स, शुभेच्छापत्र
Happy Ambedkar Jayanti 2020 Marathi Wishes: दलित-हरिजनांचा झुंझार नेता, कायदेपंडित आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांचा जन्मदिन भीम जयंती (Bhim Jayanti) म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी 14 एप्रिल दिवशी भीम अनुयायी त्यांच्या जन्म दिनाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्यांच्या कार्याचा वसा यशाशक्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. दरम्यान यंदा देशावर कोरोना व्हायरसचं संकट असल्याने यंदाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (Ambedkar Jayanti)ही घरगुती स्वरूपात साजरी करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळे यंदा तुम्हांला मित्रपरिवार, नातेवाईक आणि तमाम आंबेडकरी जनतेला भेटून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणं शक्य नसलं तरीही इंटरनेटच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप, फेसबूकवर भीम जयंतीच्या शुभेच्छा खास मराठमोळी ग्रीटिंग्स(Greetings) , मेसेजेस(Messages) , विशेज (Wishes), एसएमएस (Sms) यांच्या माध्यमातून देऊन या दिवसाचा आनंद द्विगुणित करता येऊ शकतो. सोशल मीडीयामुळे आता जगाच्या एका टोकावर बसून दुसर्या टोकावरील व्यक्तीशी संवाद साधणं सुकर झालं आहे. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Messages: आंबेडकर जयंती निमित्त मराठी संदेश, Wishes, Greetings, Whatsapp Stickers, Images च्या माध्यमातून Facebook, WhatsApp वर शेअर करून द्या भीम जयंतीच्या शुभेच्छा!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 साली महू येथे झाला. पुढे त्यांनी सातारा आणि मुंबई मध्ये शिक्षण घेतलं. लंडनला ते उच्च शिक्षणासाठी गेले. भारत स्वतंत्र झाल्यानंतर त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये कायदेमंत्रीपद भूषवले. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार आहेत. Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2020 Songs: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त महामानवाला अभिवादन करणारी खास भीमगीतं!
भीम जयंतीच्या शुभेच्छा
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले त्याने,
शिक्षणाचे महत्व समजावले ज्याने,
समाजात मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांना कोटी कोटी प्रणाम!
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
129 व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
मोजू तरी कशी उंची
तुझ्या कर्तुत्त्वाची
तू जगाला शिकविली व्याख्या
माणसाला माणूसकीची
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
चांदण्याची छाया
कापराची काया
माऊलीची माया
माझा भीमराया
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
भवतु सब्ब मंगलम्
भीमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांचे प्रेरणादायी विचार : Watch Video
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 साली गोर गरीब, अस्पृश्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी लाखो अनुयायांसह नागपूर येथे बौद्ध धर्माचा स्वीकार केला आणि अनेकांना या धर्माची दीक्षा दिली. त्यामुळे बौद्ध धर्मियांसाठी बाबासाहेब आंबेडकर हे आदराचं व्यक्तिमत्त्व आहे. दरम्यान 6 डिसेंबर 1956 साली त्यांचे दु:खद निधन झाले.