
Happy Bail Pola Marathi Wishes: महाराष्ट्रात पवित्र हिंदू महिना श्रावणाची सांगता बैल पोळा या सणाने होते. पिठोरी अमावस्येच्या दिवशी यंदा 18 ऑगस्टला बैल पोळा साजरा केला जात आहे. वर्षभर शेतामध्ये राबणार्या बैलांच्या कष्टांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा हा सण साजरा केला जातो. आज राज्यभर शेतकरी बैलांना सजवून, त्यांची पूजा करून बैलांच्या प्रती आपला आदरभाव व्यक्त करत बैल पोळ्याचा सण साजरा करणार आहेत. दरम्यान आज तुम्हांला गावाकडे जाणं शक्य नसल्यास कृषीप्रधान भारताच्या शेतकर्यांच्या आणि त्यांच्या बैलांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास मराठमोळी शुभेच्छापत्र व्हॉट्सअॅप, फेसबूक, इंस्टाग्राम, ट्वीटरच्या माधयामातून शेअर करू शकता. त्यासाठी ही खास शुभेछ्हापत्रं!
बैल पोळा 2020 मराठमोळ्या शुभेच्छा






पाहा व्हिडीओ शुभेच्छा:
बैलाची निगा राखणार्या 'बैलकरी' घरगड्यास नवीन कपडे देण्यात येतात. त्यालाही बैल पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या जातात. या दिवशी बैलांचा वाद्यांसहित मिरवणूक काढली जाते. या दिवशी बैलांना पाहुण्यांसारखे आमंत्रण करुन त्यांचा पाहुणाचार केला जातो. अशा या बैल पोळा सणाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा