Happy Army Day 2021 Messages: आर्मी डे शुभेच्छा मराठी संदेश, Greetings, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा 73 वा भारतीय सेना दिवस

भारतीय लष्कराच्या 73 व्या सेना दिनाच्या शुभेच्छा मराठी संदेश, मेसेजेस, Quotes द्वारा शेअर करण्यासाठी खास शुभेच्छापत्र

Army Day Wishes| File Photo

भारतामध्ये पहिले सेनाध्यक्ष के.एम. करिअप्पा (K. M. Cariappa) यांच्या स्मारणार्थ 15 जानेवारी हा दिवस भारतीय सेना दिवस अर्थात आर्मी डे (Army Day) म्हणून साजरा केला जातो. 15 जानेवारी 1949 मध्ये भारताचे सेनाप्रमुख पदी त्यांची नियुक्ती झाली आणि त्याच दिवसाचं औचित्य साधत हा दिवस भारतीय लष्कर जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी साजरा केला जातो. गोठवणारी थंडी असो की माथी तळपता सूर्य भारतभूमीचं रक्षण करण्यासाठी सीमेवर जवान 24 तास तैनात असतो म्हणून कदाचित आपण बिनधास्त फिरू शकतो. मग त्याच भारतीय जवानांना सलाम करण्यासाठी आज सोशल मीडीयामध्ये आर्मी डे च्या शुभेच्छा देणारी ही मराठमोळी ग्रीटिंग्स, मेसेजेस, Images, WhatsApp Status आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करू शकता. यंदा भारतीय लष्कराचा हा 73 वा सेना दिवस आहे.

करिअप्पा वयाच्या विशीत असल्यापासून सैन्यात नोकरीला होते. सेकंड लेफ्टिंनेंट पदापासून करिअप्पा यांनी नोकरीला सुरूवात केली. करिअप्पा यांनी 1947 मध्ये भारत-पाक युद्धात मह्त्त्वाची कामगिरी केली होती. दरम्यान नंतर त्यांना 'फिल्ड मार्शल' उपाधी देण्यात आली. दरम्यान सेना दिनाच्या निमित्ताने आज भारतीय नागरिक म्हणून आपलं आपल्यासाठी झटणार्‍या प्रत्येक जवानाला सलाम करणं, त्यांच्या त्यागाचं स्मरण करणं आपलं कर्तव्य आहे.

आर्मी डे च्या शुभेच्छा

 

Army Day Wishes| File Photo
Army Day Wishes| File Photo
Army Day Wishes| File Photo
Army Day Wishes| File Photo
Army Day Wishes| File Photo

व्हॉट्सअ‍ॅप स्टिकर्सच्या माध्यमातून तुम्हांला सूर जवानांना सलाम करायचा असेल तर तुम्ही ते कस्टमाईज्ड बनवू देखील शकता. मात्र गूगल प्ले स्टोअर वर तुम्हांला आर्मी डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास स्टीकर्स पॅक देखील उपलब्ध आहे.

दिल्ली मध्ये आर्मी परेड काढली जाते. या दिवसाच्या निमित्ताने आर्मी मधील शूरवीरांना मानाचे पुरस्कार देऊन जवानांना सन्मानित केले जाते. मागील वर्षी पहिल्यांदा तानिया शेरगिल या महिलेने आर्मी परेडचं नेतृत्त्व केले होते.