Happy Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा WhatsApp Status, Messenger, GIFs, SMS च्या माध्यमातून देण्यासाठी खास मराठमोळी ग्रिटिंग्स!
वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा 'अक्षय्य तृतीया' हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस यंदा 7 मे 2019 दिवशी साजरा केला जाणार आहे.
Akshaya Tritiya Marathi Wishes: अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya) हा साडेतीन मुहूर्तापैकी एक दिवस आहे. यंदा अक्षय्य तृतीया 7 मे 2019 दिवशी साजरा केला जाणार आहे. या दिवशी काहीजण सोन्याची खरेदी करतात तर काही जण शुभ कार्याची सुरूवात या दिवशी करतात. यंदाच्या अक्षय्य तृतीयेदिवशी तुम्ही मित्र-मैत्रिणी, नातलगांना आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊन हा दिवस खास बनवू शकता. त्यासाठी या शुभेच्छा GIFs, व्हॉट्सअॅप स्टेट्स (WhatsApp Status), फेसबुक स्टेटस, मेसेंजरच्या (Facebook Messenger) माध्यमातून शेअर करून त्यांचा दिवस खास बनवू शकतात. Akshaya Tritiya 2019: अक्षय्य तृतीयेला का कराल सोन्याची खरेदी? जाणून घ्या यामागील 5 मुख्य कारणं
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा
अक्षय्य तृतीया या शुभ दिनाच्या तुम्हांला आणि तुमच्या परिवाराला शुभेच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येवो
प्रत्येक दिवस तुमचा सुख, समाधानात जावो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
आपल्या आयुष्यात सुख, शांती अक्षय्य राहो
कायम आरोग्य, धनसंपदा नांदो
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिनी पूर्ण होवोत तुमच्या सार्या इच्छा
सुख, समृद्धीने भारलेला असो प्रत्येक दिवस तुमचा
अक्षय्य तृतीयेच्या हार्दीक शुभेच्छा!
अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देणारी GIF ग्रिटिंग्स
शुभेच्छा संदेश व्हिडिओ:
अक्षय्य तृतीयेदिवशी घरात एखादा गोडाचा पदार्थ बनवून हा सण साजरा केला जातो. वैशाख महिन्यामध्ये शुद्ध तृतीयेदिवशी साजरा केला जातो.