Hanuman Jayanti 2019: हनुमान जयंती का साजरी केली जाते? जाणून घ्या हनुमानाची जन्मकथा
यंदा हनुमान जयंती 19 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे.
Hanuman Jayanti 2019 Date and Time: चैत्र महिन्यापासून हिंदू नववर्षाला सुरूवात होते. नव्या वर्षात पहिल्याच महिन्यात गुढीपाडवा (Gudi Padwa), राम नवमीनंतर (Ram Navami) येणारा सण म्हणजे हनुमान जयंती (Hanuman Jayanti). हनुमान जयंती हा हनुमानाचा जन्म उत्सव चैत्र पौर्णिमेला (Chaitra Purnima) साजरा केला जातो. यादिवशी देशभरात हिंदू बांधव हनुमान (Lord Hanuman) मंदिरात जाऊन हनुमानाचे दर्शन घेतात. यंदा हनुमान जयंती 19 एप्रिल दिवशी साजरी केली जाणार आहे.
हनुमानाची जन्म कथा
हनुमान हा अंजनी आणि केसरीचा पुत्र आहे. त्याला भगवान शिव यांचा 11 वा अवतारदेखील मानला जातो. हनुमानाच्या जन्माबद्दल अनेक पौराणिक कथा आहेत. अमरत्वाच्या प्राप्तीसाठी जेव्हा देव आणि राक्षसांमध्ये युद्ध पेटलं तेव्हा समुद्रमंथनातून अमृत असूरांनी पळवलं. त्यावेळेस भागवान शिवाने वीर्य त्याग केला आणि पवनदेव (वायुदेवता) वानरराज केसरी यांचा पत्नी अंजना यांच्या गर्भामध्ये प्रवेश झाला. त्यामधून अंजनाने हनुमानाला जन्म दिला. हा दिवस चैत्र पौर्णिमेचा असल्याने या दिवशी हनुमान जयंती साजरी केली जाते.
हनुमानाला भगवान शिवाचा रूद्रअवतार समजलं जातं. त्यासोबतच 'पवनपुत्र', 'बजरंगबली' म्हणून ओळखलं जातं. महाराष्ट्रात हनुमानाला 'मारूती' असं देखील संबोधलं जातं. आजन्म हनुमानाने ब्रम्हचारी राहणं पसंत केले. भगवान राम यांच्या सेवेमध्ये त्यांनी स्वतःला वाहून घेतले.
हनुमान जयंती उत्सव मुहूर्त
हनुमानाचा जन्म चैत्र महिन्याच्या पंधराव्या दिवशी म्हणजे पौर्णिमेला साजरा केला जातो. यादिवशी सूर्योदयाच्या वेळेस हनुमान जयंती साजरी केली जाते.
शुभ मुहूर्त वेळ-: सकाळी 6.22 वाजता सूर्योदय होईल.
हनुमान जयंती दिवशी भक्त हनुमानाच्या मंदिरात जाऊन त्याचं दर्शन घेतात. हनुमानाला तेलाचा अभिषेक करून रूईची फूलं आणि वडाच्या पानाचा हार अर्पण केला जातो.