Happy Gujarat Day 2020: गुजरात स्थापना दिवसाच्या Wishes, Messages,Wallpapers च्या माध्यमातून गुजराती बांधवांना Whatsapp आणि Facebook वर शुभेच्छा देण्यासाठी खास ग्रिटिंग्स!

गुजरात दिनाच्या शुभेच्छा देऊन खास करा यंदाचा तुमच्या गुजराती मित्रमंडळींचा दिवस!

Happy Gujarat Day (File Image)

Gujarat Day 2020 Wishes and Messages:  भाषावार  प्रांतरचनेनुसार 60 वर्षांपूर्वी महाराष्ट्र आणि गुजरात प्रांताची निर्मिती झाली. त्यामुळे  1 मे हा दिवस  फक्त 'आंतरराष्ट्रीय कामगार दिन’ (International Workers' Day) म्हणून खास नसतो. तर आज महाराष्ट्र दिन (Maharashtra Day) आणि गुजरात दिन (Gujarat Day) देखील साजरा केला जातो. महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांची स्थापना 1 मे रोजी झाली होती. 2020 मध्ये दोन्ही राज्यांची स्थापना होऊन आता 60 वर्षे पूर्ण होतील. भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी ही दोन्ही राज्ये बॉम्बे स्टेटचा भाग होती. महाराष्ट्रात हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून ओळखला जातो तर गुजरातमध्ये हा दिवस गुजरात दिवस म्हणून ओळखला जातो. भाषेवार प्रांत रचनेमध्ये, स्वतंत्र गुजरातच्या मागणीसाठी 1960 मध्ये महा गुजरात आंदोलन सुरू करण्यात आले. दुसरीकडे संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची मागणी होऊ लागली. Maharashtra Day 2020 Images: महाराष्ट्र दिन शुभेच्छा मराठी Wishes, Messages, HD Wallpapers च्या माध्यमातून देत साजरा करा हा खास दिवस!  

यानंतर 1 मे 1960 रोजी तत्कालीन नेहरू सरकारने मुंबई राज्य महाराष्ट्र व गुजरात अशा दोन राज्यात विभागले. त्यानंतर मुंबईसाठी दोन्ही राज्यांची मागणी वाढू लागली, अखेर मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यात आले. तर अशा या गुजरात दिनाचे औचित्य साधून आपले गुजराती मित्र, आजूबाजूचे तसेच जवळचे लोक, शेजारी यांना खास HD images, Happy Gujarat Day 2020 greetings, wallpapers, text messages, च्या माध्यमातून शुभेच्छा देऊ देऊन हा दिवस साजरा करू शकता.

Happy Gujarat Day 2020
Happy Gujarat Day 2020
Happy Gujarat Day 2020
Happy Gujarat Day 2020
Happy Gujarat Day 2020

(हेही वाचा: Happy Workers Day 2020: आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या मराठी शुभेच्छा, Messages, Greetings, Whatsapp Status, Images च्या माध्यमातून देऊन व्यक्त करा कामगारांबद्दलचा आदर)

दरम्यान, गुजरात हे भारताच्या पश्चिम भागातील एक सधन राज्य आहे. ऐतिहासिक दृष्ट्या गुजरात प्रांत हा सिंधु संस्कृतीतल्या अनेक केंद्रांपैकी एक महत्त्वाचा भाग ओळखला जातो. राज्याची उत्तर-पश्चिम सीमा पाकिस्तानडेशी जोडली आहे. गुजरातचे क्षेत्रफळ 1,96,024 चौरस किलोमीटर आहे. येथे सापडलेल्या पुरातत्व वास्तूंद्वारे मिळालेल्या माहितीनुसार 5 हजार वर्षांपूर्वी या राज्यात मानवी संस्कृती विकसित झाली होती. ई. पू. 2500 वर्षांपूर्वी पंजाबमधील हडप्पांनी कच्छचा रण पार करून नर्मदा उपनगरात सध्याच्या गुजरातचा पाया रचला होता.