Gudi Padwa 2020: 'गुढी पाडवा' सणाचा शुभ मुहूर्त आणि पूजाविधी जाणून घ्या
पाडवा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतातील राज्यात चैत्र मासच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा गुढीपाडव्याचा सण 25 मार्चला साजरा होणार आहे.
Gudi Padwa 2020: गुढी पाडव्याचा सण मराठी बांधव अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. पाडवा महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि गोव्यासह दक्षिण भारतातील राज्यात चैत्र मासच्या शुक्ल प्रतिपदेच्या दिवशी साजरा केला जातो. यंदा गुढीपाडव्याचा सण 25 मार्चला साजरा होणार आहे. हिंदू पंचांगानुसार, या दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. त्याचसोबत हिंदू धर्मात पाडव्याच्या सणाबद्दल अनेक रुढी आणि परंपरा आहेत. पौराणीक कथेनुसार, या दिवशी भगवान ब्रम्हा यांनी सृष्टीची निर्मिती केली असल्याचे म्हटलं जातं.
गुढी पाडव्याचा दिवस हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याचं मानलं जातं. विजय, यश, समृद्धी याचं प्रतिक समजल्या जाणार्या गुढीचं पूजन करून हा सण साजरा केला जातो. दरम्यान या दिवसापासून राम जन्मोत्सवाचीही सुरूवात होते. महाराष्ट्रासह देशभरात या दिवसापासून चैत्र नवरात्र (Chaitra Navrati) साजरी केली जाते. गुढीपाडव्या दिवशी घरोघरी गुढी उभारून त्याचे पूजन केले जाते. तसेच या दिवशी गोडधोडाचे पदार्थ बनवून नववर्षाचा पहिला दिवस साजरा केला जातो. (हेही वाचा - Gudi Padwa 2020 Rangoli Designs: गुढी पाडवा निमित्त सहज सोप्या रांगोळ्या दारात काढून करा चैत्र पाडव्याचं स्वागत!)
गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त - (Gudi Padwa 2020 Subh Muhurat)
तिथी आरंभ - 24 मार्च रोजी दुपारी 2 वाजून 57 मिनटे
तिथी समाप्ती - 25 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजून 26 मिनटांपर्यंत
Gudi Padwa 2020: यंदा गुढीपाडवा निमित्त गुढी कशी उभाराल ते जाणून घ्या : Watch Video
गुढी पाडवा पूजाविधी -
गुढी उभारण्यासाठी एक स्वच्छ काठी, त्या काठीच्या टोकावर नवे वस्त्र (साडी, ब्लाउजपिस, रूमाल,) गाठी, आंब्याची पानं, कडुलिंबाची पानं, झेंडुच्या फुलांची माळ, तांब्याच्या धातुचा लोटा अश्या सर्व वस्तुंनी ही गुढी सजवली जाते. या गुढीच्या भवती रांगोळी आणि इतर सजावट केली जाते. तसेच गुढीला गोड धोडाचा नैवेद्य दाखविला जातो. गुढीचे निराजंन उदबत्ती लावून औक्षवण केलं जातं. संध्याकाळी सुर्यास्तापुर्वी हळदकुंकु अक्षता वाहुन गुढी उतरवली जाते.