Gudi Padwa 2019: गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं!
गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं....
वसंत ऋतूच्या आगमनानंतर येणारा सण म्हणजे 'गुढीपाडवा.' पाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या हिंदू नववर्षाचं स्वागत आपण सर्व आनंदात, जल्लोषात करतो. आपल्या समृद्ध परंपरेचं प्रतिक असणाऱ्या या सणांच्या निमित्ताने आपण सर्व एकत्र येतो. खरंतर आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत आपल्या सर्वांना एकत्र आणण्याचे काम हे सण करत असतात. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या सणाचा उत्साह काही औरच असतो. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी शोभायात्रा काढून नववर्षाचे जंगी स्वागत केले जाते. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या
महाराष्ट्रासोबतच आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्येही पाडवा उगादी, चेटी चांद या वेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सण म्हटलं की शुभेच्छा देणं आलंच. तर गुढीपाडवा आणि नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी संदेश, SMS, Quotes, Wishes, WhatsApp Status, GIFs आणि शुभेच्छापत्रं.... गुढीपाडव्याला 'कडूलिंब' खाण्याचे महत्त्व काय?
उंच आकाशी उभारू गुढी
जपूया नाती, जपूया रूढी
वाढवू मैत्री स्नेहाने
मने जिंकुया प्रेमाने!
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
स्वागत नव वर्षाचे,
आशा आकांक्षाचे,
सुख समृद्धीचे,
पडता दारी
पाऊल गुढीचे…!
नव-वर्ष आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
सण मराठी
मन मराठी
उभारली गुढी
आज हर्षाची,
साद मनाची
हाक प्रेमची,
भेट अशी !
"नव -वर्षाची"
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
पालवी चैत्राची
अथांग स्नेहाची,
जपणूक परंपरेची,
उंच उंच जाऊ दे गुढी
आदर्शाची, संपन्नतेची,
उन्नतीची आणि स्वप्नपूर्तीची!
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
वसंताची पहाट घेऊन आला,
नव चैतन्याचा गोडवा
समृद्धीची गुढी उभारु,
आला चैत्राचा पाडवा.
"शुभ गुढी पाडवा"
नुतनवर्षाभिनंदन!
व्हिडिओज:
GIFs
या खास शुभेच्छा देऊन यंदाचा पाडवा अगदी आनंदात आणि जल्लोषात साजरा करा. तुम्हाला सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा!
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)