मार्शा पी. जॉन्सन यांच्या स्मरणार्थ Google Doodle; जाणून घ्या कोण होते Marsha P. Johnson

Johnson यांचे एक अॅनिमेटेड छायाचित्र लावले आहे. जे अर्थातच शानदार आहे. यात मार्शा पी जॉन्सन यांच्या डोक्यात फुले माळलेली दिसत आहेत. मार्शा यांना फुलं प्रचंड आवडत असत असे सांगितले जाते. डूडलवर क्लिक करताच त्यांच्याबात विस्ताराने माहिती मिळते.

Marsha P. Johnson | (Photo Credits: Google Doodl)

जवळपास सर्वच नेटीझन्ससाठी Google Doodlee हा तसा उत्सुकतेचा विषय. आजचे गूगल डूडल (Google Doodlee) कशावर असेल याबाबत जगभरातील अनेकांना उत्सुकता असते. आजचे गूगल डूडलही तसेच आहे. आजचे Google Doodlee मार्शा पी. जॉन्सन यांच्या स्मरणार्थ बनविण्यात आले आहे. LGBTQ+ अधिकार कार्यकर्ते, परफॉर्मर आणि सेल्फ आयडेंटिफाइड ड्रॅग क्वीन Marsha P. Johnson यांचे डूडल बनवून गूगलने आज (30 जून 2020) त्यांचे स्मरण केले आहे. Marsha P. Johnson हे पेशाने एक वकील होते. आयुष्यभर त्यांनी समलैंगिक नागरिकांच्या अधिकारासाठी लढा दिला.

गूगलने आपल्या डूडलमध्ये Marsha P. Johnson यांचे एक अॅनिमेटेड छायाचित्र लावले आहे. जे अर्थातच शानदार आहे. यात मार्शा पी जॉन्सन यांच्या डोक्यात फुले माळलेली दिसत आहेत. मार्शा यांना फुलं प्रचंड आवडत असत असे सांगितले जाते. डूडलवर क्लिक करताच त्यांच्याबात विस्ताराने माहिती मिळते. (हेही वाचा, मुथुलक्ष्मी रेड्डी: भारतातील पहिल्या महिला आमदार; ज्यांच्या सन्मानार्थ बनले आजचे Google Doodle)

मार्शा पी जॉन्सन यांची ओळख केवळ समलैंगिक लोकांच्या अधिकारासाठी लढा देणारी व्यक्ती इतकीच नाही. त्यांनी एड्स सारख्या भयानक आजाराविरुद्ध लढण्यासाठीही प्रचंड काम केले. ते एक एड्स कार्यकर्ताही होते. सुरुवातीच्या काळात एड्स हा आजार झालेल्या लोकांना अत्यंत अमानवीय वागणूक मिळत असे. अशा काळात Marsha P. Johnson यांनी जगाला दमदार आवाजात सांगितले की, एड्स झालेल्या व्यक्तिकडे अशा पद्धतीने पाहणे चुकीचे आहे. त्यांना अशा काळात अधिक सन्मान देण्याची आणि समजून घेण्याची आवश्यकता आहे. एड्स कोणालाही होऊ शकतो.

Marsha P. Johnson यांनी आजच्या दिवशी म्हणजेच 30 जून रोजी न्यूयॉर्क सिटी प्राइड मार्च मध्ये दिमाखदार सोहळ्यात मार्शल ही उपाधी देऊन गौरविण्यात आले होते. मात्र, ही उपाधी त्यांना मरणोत्तर दिली गेली. मार्शा जिवंत असताना त्यांना जर ही उपाधी मिळाली असती तर, कदाचित त्यांच्या कार्याला अधिक अवाज आणि गती मिळाली असती. मार्शा पी जॉन्सन यांचा जन्म 24 ऑगस्ट 1945 मध्ये एलिजाबेथ, न्यू जर्सी येथे झाला. सांगितले जाते की Marsha P. Johnson हे स्वत:ही गे होते. त्या काळात गे असणे काहीतरी भयंकर आहे असे समजले जात असे. त्या काळात मार्शा जॉन्स आपल्या अधिकारासाठी लढले. सोबतच इतरांच्याही अधिकारांसाठी लढले. त्यांच्या कार्यासाठी त्यांना आजही नावाजले जाते. (हेही वाचा, अमृता प्रीतम यांचा 100वा स्मृतिदिन Google Doodle, पंजाबी भाषेतील या लोकप्रिय कवयत्रीबद्दल घ्या जाणून)

मार्शा पी जॉन्सन यांच्या आईचे नाव अलबर्टा क्लिबोर्न असे होते. Malcolm Michaels Jr यांच्या घरी मार्शा यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब एक मध्यमवर्गी प्रकारात मोडणारे होते. त्यांचे वडील एका कारखाण्यात काम करत असत. 1963 मध्ये प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी न्यू यॉर्क ग्रीनविज विलेज येथे प्रवेश केला. न्यू यॉर्क ग्रीनविज विलेज हा एलजीबीटी + लोकांचे सांस्कृतिक केंद्र म्हणून ओळखले जाते.