Google Doodle, International Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त खास गूगल डूडल; घ्या जाणून

या उत्साहात इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल (Google) देखील सहभागी झाले आहे. गूगल डूडल (Google Doodle) निर्मीती करुन सर्च इंजिनने या खास दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

International-Womens-Day-Google-Doodle | Photo Credits: Google)

Google Doodle, International Women's Day: आंतरराष्ट्रीय महिला दिन जगभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. या उत्साहात इंटरनेट विश्वातील सर्वात मोठे सर्च इंजिन गूगल (Google) देखील सहभागी झाले आहे. गूगल डूडल (Google Doodle) निर्मीती करुन सर्च इंजिनने या खास दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. ज्यामध्ये आपण विविध गोष्टींचा समावेश झाल्याचे पाहू शकता. महिलांचे अस्तित्व आणि त्यांचे योगदान यानिमित्त हा दिवश जगभरामध्ये विशेष उल्लेखाने साजरा केला जातो. त्यानिमित्त आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतीत आणि इतरही अनेक क्षेत्रांमध्ये महिलांनी केलेल्या अतुलनीय कामगिरीची दखल घेतली जाते. त्याबाबत त्यांचे कौतुक केले जाते. तसेच, महिलांच्या समस्यांवरही जगभरामध्ये काय कार्यवाही होते, याचाही आढावा घेतला जातो.

गूगल डूडल वैशिष्ट्य

आजचे गूगल डूडल हे आंतरराष्ट्रीय महिला दिन आणि लैंगिक समानता यांच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा उत्साह साजरा करते. आजच्या गूगल डूडलमध्ये वेगवेगळ्या पिढीतील महिलांचा समावेश आहे. ज्यामध्ये एक वृद्ध महिला हातात पुस्तक घेऊन ज्ञानदान करताना दिसते. तर इतर महिलाही वेगवेळ्या उत्साहात तल्लीन झालेल्या दिसतात. आजचे डूडल सोफीया डियाओ (Sophie Diao) यांनी तयार केले आहे. डियाओ यांनी हेच डूडल का तयार केले यामागची प्रेरणा सांगताना म्हटले आहे की, मला वाटते की, लोकांनी आपल्या दुसऱ्या पीढीसोबत अधिक काळ घालवायला पाहिजे. आपल्या आगोदरच्या वेगवेगळ्या पिढ्यांपासून शिक्षण्यासारखे खूप काही आहे. (हेही वाचा, Women's Day 2024 HD Images: महिला दिनानिमित्त Quotes, Greetings, Messages शेअर करुन करा तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या स्त्रीयांचा सन्मान!)

जागतिक महिला दिन इतिहास

जागतिक महिला दिवस जरी 8 मार्च रोजी साजरा केला जात असला तरी, त्याला मोठा इतिहास आहे. जगभरामध्ये 28 फेब्रुवारी 1909 मध्ये सोशालिस्ट पार्टी ऑफ अमेरिकाने न्यूयॉर्क शहरात प्रथम हा दिवस साजरा केला. असा दिवस साजरा करण्याची सूचना कामगार नेता Theresa Malkiel यांनी केली होती. शहरातील कापड उद्योगात काम करणाऱ्या महिलांचे होणारे शोषण थांबविण्याच्या दृष्टीने हा दिवस साजरा करण्याची हाक दिली होती. याच दिवशी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही करण्यात आले होते. पुढे 1010 मध्ये अमेरिकेतील समाजवादी गटाकडून प्रेरणा घेत जर्मणीमध्येही असा दिवस साजरा करण्याचा प्रस्ताव आला पण त्याला तितका प्रतिसाद मिळाला नाही. पुढे संयुक्त राष्ट्र संघानेच सन 1975 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. त्याच्याच दोन वर्षांनी पुढे म्हणजे 1975 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेत 8 मार्च हा दिवस जागतिक पातळीवर महिला दिन म्हणून साजरा करण्याचे ठरले आणि तशी घोषणा झाली.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif