Google Doodle Celebrates New Year's Eve: गूगल डूडल द्वारे सरत्या वर्षाला निरोप, साजरी केली नववर्षाची पूर्वसंध्या

या डूडलबद्दल स्पष्टीकरण देताना गुगलने लिहिले आहे की, हे डूडल नवीन वर्षाची सुरुवात करण्यासाठी चमक आणते! घड्याळाचे काटे जसजसे जवळ येत आहे आणि मध्यरात्री जवळ येत आहे, तसतसे जगभरातील लोक त्यांच्या नवीन वर्षाचे संकल्प आखत आहेत आणि यश, प्रेम, आनंद आणि प्रत्येक गोष्टीसाठी शुभेच्छा देत आहेत."

Google Doodle Celebrates New Year's Eve (PC -Google)

New Year's Eve: आज वर्षाचा शेवटचा दिवस आहे. उद्यापासून नवीन वर्ष म्हणजेच 2024 (New Year 2024) सुरू होत आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने नववर्षाचे स्वागत करण्याच्या तयारीत व्यस्त आहे. अशात गुगल मागे कसे राहणार? Google देखील आपले डूडल (Google Doodle) बदलून नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. Google डूडल प्रत्येक वेळी उत्सवपूर्ण प्रदर्शनासह नवीन वर्षाची संध्याकाळ (New Year's Eve) साजरी करते. यावेळी गुगल डूडलने नवीन वर्षाची सकारात्मक सुरुवात करण्यासाठी खास डूडल साकारल आहे.

मध्यरात्रीची उलटी गिनती जसजशी वाढत आहे, तसतसे जगभरातील लोक त्यांचे नवीन वर्षाचे संकल्प पूर्ण करण्यासाठी तयारी करत आहेत. वर्णनात, Google डूडलने लिहिले आहे "3… 2… 1… नवीन वर्षाच्या शुभेच्छा!" (हेही वाचा -New Year's Resolutions for 2024: नववर्षाच संकल्प करताय? 'ही' पाच पुस्तके नक्की वाचा, अल्पावधीतच दिसेल परिवर्तन)

 

या डूडलमध्ये गुगलला मोठ्या डिस्को लाइटने पार्टी थीमवर सजवण्यात आले आहे. 2024 चे स्वागत करण्यापूर्वी जगभरातील लोक संकल्प आणि महत्त्वाकांक्षेने भरलेल्या नवीन वर्षाच्या सुरुवातीसाठी सज्ज होत आहेत. 1998 ते 2023 पर्यंत, Google ने विविध प्रसंग साजरे करून, व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून 5000 डूडल तयार केले आहेत.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now