Good Friday 2020 Images: गुड फ्रायडे निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers शेअर करुन स्मरा प्रभू येशूंच्या त्यागाचा आणि बलिदानाचा दिवस
याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात आजचा गुड फ्रायडेचा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो.
Good Friday Images: ख्रिस्ती धर्मातील समजुतीप्रमाणे या दिवशी येशू ख्रिस्तांना क्रॉसवर चढवण्यात आले. याची आठवण ठेवून ख्रिस्ती जगात आजचा गुड फ्रायडेचा दिवस शोकदिवस म्हणून मानला जातो. काही ख्रिस्ती पारंपारिक देशांमध्ये राष्ट्रीय दु:खवट्याप्रमाणे साजरा होतो. या दिवशी कोणत्याही आनंदायक कार्यक्रम साजरा करण्यात येत नाहीत. तसेच ख्रिस्ती लोक चर्च मध्ये जाऊन येशूने केलेल्या बलिदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.आजचा दिवस केवळ येशूंच्या संदेशाचे स्मरण करण्यासोबत ते आचरणात आणण्यासाठी प्रेरित करणारा आहे.
आजपासून दोन हजार वर्षांपूर्वी जेरुसलेममधील गॅलिली प्रांतात तरुण येशू लोकांना मानवता, बंधूभाव, एकता आणि शांतीचा संदेश देत होते. ज्यामुळे लोकांनी त्यांना परमपिता परमेश्वर मानण्यास सुरुवात केली. त्यामुळे समाजामध्ये अंधश्रद्धा पसरवून त्याचा फायदा घेणार्या धर्मगुरुंचा तिळपापड व्हायला लागला. म्हणून त्यांनी येशूंना मानवतेचा शत्रू म्हणण्यास सुरुवात केली. परंतु, तरीही त्यांची लोकप्रियता वाढतच राहिली. येशूंची दिवसेंदिवस वाढणारी लोकप्रियता धर्मगुरुंच्या डोळ्यात खूपत होती. त्यामुळे त्यांनी रोमचा शासक पिलातूस याचे कान भरण्यास सुरुवात केली. स्वत:ला ईश्वराचा पुत्र मानणारा हा युवक पापी आहे. त्याने धर्माचा अपमान केला आहे, म्हणून येशूंवर राजद्रोहाचा आरोप लावण्यात आला. त्यानंतर त्यांना फटके मारण्यात आले. काट्यांचा मुकूट घालण्यात आला. हाल-हाल करून त्यांना सुळावर चढविले.(Palm Sunday 2020: जाणून घ्या ख्रिस्चन बांधव का साजरा करतात 'पाम संडे'चा दिवस; या सणाचे महत्व व इतिहास)
पापी व अत्याचारी लोकांनी मिळून येशूंना यातना दिल्या आणि त्यांना सुळावर चढविले. तेव्हाही प्रभू येशूंच्या मुखातून क्षमा आणि कल्याणाचा संदेशच बाहेर पडला. हा त्यांच्या क्षमाशील तत्वांचा आदर्श मानला जातो. "हे प्रभो, यांना माफ कर. कारण यांना माहीत नाही की ते काय करत आहेत.." असे शेवटचे उद्गार येशूंच्या मुखातून निघाले तेच येशूंचे अंतिम वचन असल्याचे मानले जाते.