Bal Gopal Jhula Decoration Idea: गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण जन्मोत्सवाला बाळकृष्णाचा पाळणा आकर्षक रित्या कसा सजवाल?
यंदा कृष्ण जयंतीचा (Krishna Jayanti) सण साजरा करताना तुमच्या घरी देखील कृष्ण जन्मोत्सवाची लगबग असेल तर या गोकुळाष्टमीला पहा श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी पाळणा कसा सजवाल?
Gokulashtami 2020 Jhula Decoration Idea: जन्माष्टमीचा उत्सव भारतभर यंदा 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान साजरा केला जाणार आहे. भगवान विष्णूचा आठवा अवतार असणार्या श्रीकृष्णाने पृथ्वीवर श्रावण कृष्ण अष्टमीला जन्म घेतल्याने हा कृष्ण जयंतीचा दिवस गोकुळाष्टमी म्हणून देखील साजरा केला जातो. श्री कृष्ण जन्माष्टमी (Krishna Janmashtami) जशी सामुहिक स्वरूपात कृष्णाच्या मंदिरामध्ये साजरी केली जाते तशीच ती घरा घरामध्ये साजरी करण्याची प्रथा आहे. त्यासाठी खास घरामध्येच बाळकृष्णाच्या जन्मोत्सवासाठी खास पाळणा सजवला जातो. मग यंदा कृष्ण जयंतीचा (Krishna Jayanti) सण साजरा करताना तुमच्या घरी देखील कृष्ण जन्मोत्सवाची लगबग असेल तर या गोकुळाष्टमीला पहा श्रीकृष्ण जन्मोत्सवासाठी पाळणा कसा सजवाल? घरच्या घरी काही उपलब्ध वस्तूंचा, आकर्षक मणी, मोती यांच्यासह मलमली कापडाचा वापर करून तुम्ही अगदी आकर्षक पणे बाळकृष्णाचा पाळणा सजवू शकता. Janmashtami 2020 Vrat: गोकुळाष्टमी दिवशी कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्याचा शुभ मुहूर्त, पूजा विधी!
कृष्ण जन्मोत्सव साजरा करणारे अनेक कृष्णभक्त आज कृष्ण जन्माष्टमीचं व्रत पाळतात. मध्यरात्री कृष्ण जन्म साजरा झाल्यानंतर व्रत संपते. दरम्यान आजच्या दिवशी दही, आंबोळ्या, शेंगल्याची भाजी यांचा जेवणात समावेश केला जातो. दहीकाल्याच्या दिवशी दही-पोहे-दूधाचा काला बनवून प्रसाद म्हणून त्याचे वाटप केले जाते.
बाळकृष्णासाठी आकर्षक झोपाळा कसा सजवाल?
कृष्ण जन्माष्टमी उत्तर भारतामध्ये प्रामुख्याने मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते. कृष्ण जन्मोत्सवाच्या वेळेस बाळकृष्णाची मूर्ती झोपाळ्यात ठेवून त्याला झुलवलं जातं. भगवान कृष्णाची मैय्या यशोदा मथुरेमध्ये त्याला पाळण्यात ठेवत असे त्यामुळे कृष्ण भक्त देखील त्याची तशाचप्रकारे आराधना करतात. अनेकांची अशी आराधना आहे की, कृष्णाष्टमीच्या या सोहळ्यातून तुमचे आणि तुमच्या मुलांसोबतचे ऋणानुबंध अधिक मजबूत होतात. असं म्हणतात जेव्हा यशोदा कृष्णाला पाळण्यात खेळताना, शांत निवांत पहुडताना पहायची तेव्हा तिला आनंद वाटायचा.