Swami Samarth Prakat Din 2024 Messages: स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून द्या खास शुभेच्छा!
स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही स्वामींच्या भक्तांना खालील संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.
Swami Samarth Prakat Din 2024 Messages: यंदा बुधवार 10 एप्रिल रोजी स्वामी समर्थ प्रकट दिन (Swami Samarth Prakat Din 2024 Messages) साजरा होणार आहे. महाराष्ट्रात हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अक्कलकोट (Akkalkot) येथे खूप काळ वास्तव्य केलेले श्रीपाद वल्लभ व श्रीनृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्रीदत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार अवतार आहेत, अशी मान्यता आहे.
स्वामी समर्थ हे विद्यमान आंध्रप्रदेशातल्या श्री शैल्यम क्षेत्राजवळील कर्दळीवनातून प्रकट झाले. त्यांनी तेथून आसेतुहिमाचल भ्रमण केले. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...! हे खास वाक्य स्वामी आपल्या भक्तांना धीर देताना म्हणत असतं. महाराष्ट्रात स्वामी समर्थांच्या भक्तांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त Images, Wallpapers, WhatsApp Status च्या माध्यमातून तुम्ही स्वामींच्या भक्तांना खालील संदेश पाठवून खास शुभेच्छा देऊ शकता.
निःशंक हो, निर्भय हो, प्रचंड स्वामीबळ पाठीशी,
नित्य आहे रे मना । अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,
अशक्य ही शक्य करतील स्वामी
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
हातावरील रेषेत दडलेले भविष्य पाहू नका
तर त्याच हाताने प्रामाणिकपणे काम आणि मुखात स्वामीनाम राहू द्या
स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा !
आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा
म्हणजे तुम्हाला इतरांचा दोष पाहायला वेळ मिळणार नाही
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
मृत्यूनंतर जे जे काढून घेतले जाईल तो संसार असेल.
पण मृत्यूनंतर जे चितेच्या ज्वालासोबत लपेटून घेईल
ते तुमचे कर्म असेल आणि मी तुमच्यासोबत असेन
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
गरीबाला केलेले दान आणि सद्गुरू स्वामींचे
मुखात घेतलेले नाम कधीच फुकट जात नाही
श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
इसवी सन 1856 मध्ये स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला. तेथील बावीस वर्षांच्या वास्तव्यात अक्कलकोट हे तीर्थक्षेत्र झाले. येथे त्यांनी जगातील अनेक मान्यवरांना मार्गदर्शन केले.
(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2024 11:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

