Gudi Padwa Shobha Yatra 2019: गिरगाव गुढीपाडवा 2019 चं सेलिब्रेशन कसं रंगणार? 29 मार्च ते 6 एप्रिल दरम्यान होणार्‍या कार्यक्रमांची यादी

यंदा गुढी पाडवा 6 एप्रिल 2019, शनिवार दिवशी आहे.

Gudi Padwa 2019 |Image used for representational purpose | ( Photo Credits: Instagram)

Girgaon Gudi Padwa Shobha Yatra 2019:  हिंदू नवंवर्षाची सुरूवात म्हणजे गुढी पाडवा (Gudi Padwa). यंदा गुढी पाडवा 6 एप्रिल 2019, शनिवार दिवशी आहे. आज सण साजरा करण्याची पद्धत बदलली असली तरीही मुंबईसारख्या मेट्रोपोलिटन शहरामध्ये मराठमोळंपण जपलं जातं. त्यापैकी एक म्हणजे गिरगावचा पाडवा सेलिब्रेशन! मुंबईभरातील तरूणाई या दिवशी गिरगावमध्ये (Girgaon) जमते. ढोला ताशाच्या गजरामध्ये आकर्षक रांगोळ्यांनी गिरगावमध्ये गुढीपाडवा साजरा केला जातो. दरवर्षी स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे गिरगाव पाडव्याचं आयोजन केलं जातं. पारंपरिक पद्धतीने साजऱ्या होणारा यंदाचा गुढी पाडवा कधी आणि शुभ मुहर्त याबद्दल अधिक जाणून घ्या

गिरगाव पाडवा 2019 चं सेलिब्रेशन कसं असेल?

‘ज्योतीने तेजाची आरती’ या संकल्पनेवर यंदा गिरगावमध्ये गुढी पाडवा साजरा केला जाणार आहे.

29-30 मार्च 2019

7000 चौरस फूटाची महारांगोळी यंदा साकारलेली जाणार आहे. या महारांगोळीकरिता २०० किलो रांगोळी आणि 600 किलो रंग वापरण्यात येणार आहेत. मुंबईकरांना 29 आणि 30 मार्च दिवशी ही रांगोळी मुंबईकरांना पाहण्यासाठी खुली ठेवण्यात येणार आहे. सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत माधवबाग पटांगण, सी. पी. टँक येथे ही रांगोळी पाहता येईल. Gudi Padwa 2019 Shobha Yatra: पुणे,नाशिक,कोल्हापूर सह मुंबईमध्ये यंदा कुठे निघणार गुढीपाडवा शोभायात्रा,स्वागतयात्रा

31 मार्च 2019

गिरगावच्या पाडव्यामध्ये रॉयल इन्फिल्डवर असो किंवा अगदी ढोल वाजवणारी तरूणी असो सार्‍याच नऊवारी साड्या नेसून मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. यंदा तरूणींना आणि महिलांना नऊवारी साडी नेसवण्याचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 31 मार्च दिवशी 3-5 वेळात मोफत प्रशिक्षण आर्यन शाळेत दिले जाणार आहे.

6 एप्रिल

गुढी पाडवा दिवशी सकाळी आठ वाजता फडके मंदिरापासून भव्य मिरवणूक निघणार आहे. गिरगावच्या पाडवा शोभायात्रेमध्ये आबालवृद्ध पारंपारिक वेषभूषेमध्ये सहभागी होतात.

 

View this post on Instagram

 

#jagadambpadwa2019 #Jagadamb #Girgaon#Padwa2019 #Mumbaikar #insta #Fspphotographers #fsp #Marathi #Culture #Girgaonkar #Maharashtra#Dholtasha #Pune#Music

A post shared by Jagadamb_Mumbai / जगदंब,मुंबई (@jagadamb_mumbai) on

आकर्षण काय असतं?

स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे आयोजित गिरगाव पाडव्याचं यंदा 17 वे वर्ष आहे. मग यापूर्वी कधीच गिरगाव पाडव्याच्या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाला नसाल तर यंदा नक्की सहभागी होऊन थोड्या हटके अंदाजात सेलिब्रेट करून पहा.



संबंधित बातम्या