Ghatasthapana 2021 Wishes In Marathi: घटस्थापना व नवरात्रीच्या शुभेच्छा, WhatsApp Status, Facebook Messages शेअर करत आप्तांच्या दिवसाची करा मंगलमय सुरूवात
Ghatasthapana 2021 Wishes In Marathi: सध्या करोनाच्या दहशतीमुळे प्रिय व्यक्तिंना भेटून घटस्थापनेच्या शुभेच्छा देता येत नसल्या तरीही WhatsApp Status, Stickers, Facebook Messages द्वारा या मंगलपर्वाचा आनंद तुम्ही नक्कीच द्विगुणित करू शकता.
अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून शारदीय नवरात्रीला (Sharadiya Navratri) सुरूवात होते. नवरात्रीचा पहिला दिवस हा घटस्थापनेचा (Ghatasthapana) असतो. यंदा घटस्थापना 7 ऑक्टोबर दिवशी केली जाणार असून पुढील 8 दिवस नवरात्रीचा जागर केला जाणार आहे. मग अशा या मंगल पर्वाच्या दिवशी आनंद तुमच्या प्रियजणांसोबत शेअर करताना घटस्थापनेच्या आणि नवरात्रीच्या शुभेच्छा आप्तांना, प्रियजणांना, मित्रमंडळींना मराठमोळ्या ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्राद्वारा देण्यासाठी लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेली ही ग्रीटिंग्स तुम्ही नक्की शेअर करू शकता. सोशल मीडीयाच्या जमान्यात आणि सध्या करोनाच्या दहशतीमुळे प्रिय व्यक्तिंना भेटून घटस्थापनेच्या शुभेच्छा देता येत नसल्या तरीही WhatsApp Status, Stickers, Facebook Messages द्वारा या मंगलपर्वाचा आनंद तुम्ही नक्कीच द्विगुणित करू शकता. नक्की वाचा: Navratri Invitation Card Format in Marathi: नवरात्री दरम्यान 'माता की चौकी'चं आप्तांना, मित्रमंडळींना आमंत्रण देण्यासाठी WhatsApp Messages, Images.
घटस्थापनेच्या दिवशी तांब्यात किंवा मातीच्या भांड्यात नवं धान्य रूजवलं जातं. हे रूजवण दसर्या दिवशी केसात माळलं जातं. तर नवरात्रीच्या नऊ रात्री मांडवाला एक माळ माळून, अखंड नंदादीप तेवत ठेवून श्रीमहाकाली, महालक्ष्मी आणि सरस्वती यांचं पूजन केले जातं. मग अशा या मंगलपर्वाचा आनंद यंदा तुमच्या मित्रमंडळींसोबतची नक्की शेअर करा.
घटस्थापनेच्या मराठी शुभेच्छा
घटस्थापना आणि शारदीय नवरात्री तुमच्या आयुष्यात
सुख, समृद्धी, शांती घेऊन येवो हीच सदिच्छा
घटस्थापनेच्या मंगलपर्वाच्या हार्दीक शुभेच्छा
शरदात रंग तसे,
उत्सव नवरात्रीचा
ओसांडून वाहूदे आपल्या जगतात,
महापूर नाविन्याचा अन् आनंदाचा
घटस्थापना व नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा!
या देवी सर्वभूतेषु शक्ति-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥
घटस्थापनेच्या मंगलमय शुभेच्छा
घटस्थापनेच्या मंगलदिनाच्या हार्दीक शुभेच्छा!
अंबा, माया, दुर्गा, गौरी
आदिशक्ती तूच सरस्वती
सकल मंगल माझ्याच घटी
विश्वाची स्वामिनी जगतजननी
घटस्थापनेच्या शुभेच्छा
नवरात्र विशेष व्हॉट्सअॅप स्टिकर्स
नवरात्रीच्या शुभेच्छा आता खास व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या मदतीने शेअर करण्याची देखील सोय आहे. याकरिता प्ले स्टोअर मध्ये 'Navratri', 'Happy Navratri 2020', 'Navratri Stickers', 'Navratri Photo Frames', असं सर्च करा.तुम्हांला अनेक कलरफूल व्हॉट्सअॅप स्टिकर्स मिळू शकतात.
यंदा देखील नवरात्रीवर कोरोनाचं संकट आहे. पण आता विळखा बराचसा कमी झाल्याने घटस्थापनेच्य मुहुर्तावर राज्यात प्रार्थनास्थळं उघडणार आहेत. मुंबई वगळता राज्यात इतर ठिकाणी नवरात्री निमित्त दांडिया खेळता येणार आहे पण त्यासाठी कोविड निर्बंधांची मर्यादा असणार आहे.