Gauri Pujan Wishes In Marathi: गौराई पूजनाच्या शुभेच्छा WhatsApp Status, Facebook Messages द्वारा शेअर करत साजरा करा सण माहेरवाशिणींचा !
सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहता, सासरी गेलेली मुलगी या काळात लाडकी गौर म्हणून माहेरी परत येते, अशी भावना या सणामागे आहे. आई आपल्या लेकीचे मनापासून लाड पुरवते, हा भावनिक पैलूही या सणाला विशेष महत्त्व देतो.
Gauri Pujan 2026 Messages In Marathi: महाराष्ट्रात गणेशोत्सावाची जितकी धामधूम असते तितकीच या दिवसांमध्ये गणरायाच्या पाठोपाठ माहेरी आलेल्या गौराईची देखील असते. यंदा गौराईचं आगमन 17 सप्टेंबरला झाल्यानंतर 18 सप्टेंबरला गौरी पूजन (Gauri Pujan) आणि 19 सप्टेंबरला गौरी विसर्जन होणार आहे. मग आज माहेरवाशिणींचा खास गौराई पूजनाचा सण आनंदात साजरा करण्यासाठी गौरी पूजनाचा सण साजरा करत तुमच्या घरातील माहेरवाशिणींना या सणाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.
गौराई पूजन हा महाराष्ट्राच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोकणात ज्येष्ठा-कनिष्ठा पूजन असते तर विदर्भासह मराठवाडा आणि अन्य भागात याच गौराईचं पूजन महालक्ष्मी म्हणून देखील केलं जाते. सांस्कृतिक दृष्टिकोनातून पाहता, सासरी गेलेली मुलगी या काळात लाडकी गौर म्हणून माहेरी परत येते, अशी भावना या सणामागे आहे. आई आपल्या लेकीचे मनापासून लाड पुरवते, हा भावनिक पैलूही या सणाला विशेष महत्त्व देतो. नक्की वाचा: Gauri Ganpati Invitation Card Format in Marathi: गौरी-गणपतीचं आमंत्रण देण्यासाठी खास मराठमोळे मेसेज नमुने .
गौराई पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
आली गौराई सोनियाच्या पावली,
घराघरात उजळली आनंदाची ज्योत सावली.
सुख, समृद्धी, आरोग्य लाभो तुम्हा सर्वांना,
गौरी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
तीन दिवसांची पाहुणी आली घरा,
आनंद, समाधान देवो भरभरून सारा.
गौराईची कृपा राहो सदा पाठीशी,
गौरी पूजनाच्या शुभेच्छा !
आली गौराई माहेरी परतून,
आनंद फुलला मनामनातून.
सुख, शांती, समृद्धी येवो घरा,
गौरी पूजनाच्या शुभेच्छा तुम्हा सर्वांना
गौरी पूजनाच्या शुभेच्छांमागे केवळ औपचारिकता नसून, कुटुंबातील नाती अधिक घट्ट करण्याचा हेतूही असतो. या निमित्ताने लांब राहणारे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणी एकमेकांच्या संपर्कात येतात, ज्यामुळे सणाचा आनंद द्विगुणित होतो.
गौराई पूजेदरम्यान पार्वती मातेला 16 प्रकारचे नैवेद्य दाखवले जातात. घरोघरी गौरींची सजावट, फराळाचे पदार्थ आणि पारंपरिक विधींनी हा सण साजरा केला जातो. एकंदरीत ही निसर्गशक्तीची आराधना असल्याचे मानले जाते.