Ganesh Chaturthi 2019: गणरायाच्या स्वागतासाठी आणि पूजेसाठी लागणा-या साहित्याची करुन घ्या एकदा उजळणी, येथे पाहा साहित्याची संपुर्ण यादी
गणेश भक्तांसाठी गणेशाच्या आगमनापूर्वी पुढे दिलेली साहित्याची यादी नक्कीच कामी येईल
Ganeshotsav 2019: गणरायाच्या स्वागतासाठी सर्वच गणेश भक्त जोरदार तयारी ला लागले असून बरेच चाकरमानी गणेश चतुर्थीनिमित्त (Ganesh Chaturthi) गावाकडे जायला निघाले असतील. बाप्पाच्या स्वागतासाठी काय करु आणि काय नको अशी सर्व गणेशभक्तांच्या मनाची अवस्था झाली असेल असं म्हणायला हरकत नाही. म्हणून अशा वेळी अनेकदा गणेश भक्त ब-याचदा गोंधळून जातात किंवा त्यांच्याकडून काही वस्तू आणायच्या राहून जातात. कारण सर्वांचे लाडके आराध्य दैवत काही दिवसांसाठी का होईना पण त्यांच्या घरी विराजमान होणार असल्यामुळे त्यांच्या पाहुणाचारात काही कमी पडू नये ही भीती सर्वांनाच असते.
अशा वेळी द्विधा मनस्थितीत असलेल्या गणेश भक्तांसाठी गणेशाच्या आगमनापूर्वी पुढे दिलेली साहित्याची यादी नक्कीच कामी येईल
गणपतीची मूर्ती आणताना:
1. हळद
2. कुंकू
3. अक्षता
4. गुलाल
5. ताट
6. ताटात गणपती ठेवण्यासाठी आसन
7. मोठ्या आकाराचा नवीन रुमाल
गणपतीची मूर्ती दारात आल्यावर:
1. पाय धुण्यासाठी तांब्याभर पाणी
2. दूध
3. पोळीचा तुकडा
4. औक्षणासाठी ताटात दोन तेलाचे दिवे, कुंकू, अक्षता, सोन्याची अंगठी, सुपारी)
पूजा मांडण्यासाठी:
1. पाट/चौरंग
2.आसन (चौरंगावर ठेवण्यासाठी)
3. रांगोळी
4. समई
5. समईतील वाती
6. निरांजन (2)
7. निरांजनासाठी तुपात भिजवलेल्या वाती
8. पंचारती
9. तांदूळ
10. घंटा
11. शंख
12. उदबत्तीचे घर/ स्टँड
13. विड्याची पाने (25)
14. सुट्टे पैसे (10 नाणी)
15. सुपारी (20 नग)
16. खारीक (5 नग)
17. बदाम (अख्खे 5 नग)
18. हळकुंड (5 नग)
19. फळे (5)
20. खोब-याचे तुकडे
21. नारळ
22. नैवेद्य दाखविण्यासाठी छोट्या वाट्याला
हेही वाचा-
Ganesh Chaturthi 2019: का साजरी केली जाते गणेश चतुर्थी, जाणून घ्या गणपती बाप्पाच्या जन्माची कहाणी
पूजा करण्यासाठी लागणा-या गोष्टी
1. हळद
2. कुंकू
3. अक्षता
4. अष्टगंध
5. गुलाल
6. अत्तर
7. थोडासा कापूस
8. उदबत्ती
9. धूप
10. कापूर
11. काडेपेटी
12. फुले
13. फुलांचा हार
14. दुर्वा
15. विडयाची पाने
16. पत्री (शमीचे पान, रुईचे पान, आघाडा, केवड्याचे पान इ.)
17. जानवं
18. पाण्याने भरलेला तांब्या
19. पळी आणि भांडे
20. ताम्हण
21. पंचामृत
22. तुपाची वाटी
23. तेलाची छोटी बरणी
24. उपवस्त्र (2 मणी)
25. वस्त्रमाळ (21 मणी)
26. गणपतीला घालायचे दागिने
गणेश चतुर्थी ला अगदी काहीच दिवस उरले असल्यामुळे समई, वाती, निरांजन, नारळ या गोष्टी जवळ करण्यास सुरुवात करा. तसेच चतुर्थीच्या एक दिवस आधी फुले, फुलांचे हार, दुर्वा ही तयार ठेवा.