Ganeshotsav 2019: आपल्या राशीनुसार निवडा गणपतीच्या मूर्तीचे रंग; घरात नांदेल सुख समाधान व राहील बाप्पाचा आशीर्वाद
तसेच इतर काही समस्या असतील त्याही बाप्पांच्या आशीर्वादाने दूर होतील
महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणून गणपती उत्सवाकडे पहिले जाते. यावर्षी 2 सप्टेंबरपासून गणेशोत्सवाला (Ganeshotsav) गणेशोत्सवाला सुरुवात होईल. 11 दिवस बाप्पा घरात विराजमान असतील. ठिकठिकाणी सार्वजनिक गणपती मंडळेही मोठ्या धूमधडाक्यात हा सण साजरा करतील. आजकाल इको फ्रेंडली गणेश मूर्तींची स्थापना करावी असे आवाहन करण्यात येत आहे. आपल्या हा छोट्याशा कृतीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यास थोडाफार हातभार लागू शकतो. मात्र इको फ्रेंडली मातीसोबत या मूर्तींचा रंग आपल्या राशीनुसार निवडल्यास घरातील सुख-शांती अबाधित राहण्यास मदत होऊ शकते. तसेच इतर काही समस्या असतील त्याही बाप्पांच्या आशीर्वादाने दूर होतील. चला पाहूया काय आहेत हे रंग
मेष आणि वृश्चिक -
मेष व वृश्चिक या दोन्ही राशीचा स्वामी मंगळ आहे. नोकरीमध्ये काही समस्या उद्भवत असल्यास त्या दूर होण्यासाठी, मेष व वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या गणपतीची स्थापना करावी.
वृषभ -
या राशीचा स्वामी शुक्र असल्याने त्यांनी फिकट निळ्या रंगाच्या गणपतीच्या मूर्तीची स्थापना करावी.
मिथुन आणि कन्या -
या दोन्ही राशीचा ग्रह बुध आहे. त्यामुळे मिथुनवाल्यांनी हलक्या हिरव्या रंगाचा गणपती स्थापना करावी, तर कन्या राशीवाल्यांनी गडद हिरव्या रंगाच्या गणपतीची स्थापना करावी.
कर्क -
कर्क राशीवर चंद्राचा प्रभाव आहे, जीवनात सुख आणि शांती अबाधित राहावी म्हणून या राशीच्या लोकांनी पांढऱ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करावी.
सिंह -
सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे. या राशीच्या लोकांनी शेंदुरी रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. (हेही वाचा: Ganeshotsav 2019: घरीच बनवा Eco Friendly Ganpati ; जाणून घ्या खास पद्धत (व्हिडिओ))
तूळ -
या राशीचा स्वामी शुक्र ग्रह आहे. या राशीच्या जातकांनी पांढर्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. असे केल्याने विवाहित जीवनात आनंद राहण्यास मदत मिळते.
धनू आणि मीन -
धनू आणि मीन या राशींचा स्वामी बृहस्पति ग्रह म्हणजे गुरु आहे. पिवळा रंग या राशीशी जुडला गेला आहे. त्यामुळे या दोन्ही राशीच्या लोकांनी पिवळ्या रंगाच्या गणपतीची स्थापना करावी.
मकर आणि कुंभ -
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांवर शनिचा प्रभाव असतो. मकर राशीच्या लोकांनी गणेश चतुर्थीला हलक्या निळ्या रंगाची गणपतीची मूर्ती स्थापित केली पाहिजे. कुंभ राशीच्या लोकांनी गडद निळ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती स्थापित करणे फायद्याचे ठरते.
(सूचना- वरील मजकूर केवळ प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास कोणत्याही प्रकारचा सल्ला समजू नये. लेटेस्टली मराठी या मजकूराची पुष्टी करत नाही)