Ganesh Chaturthi Flower Decoration Ideas: यंदा गणपतीची आरास आकर्कष फुलांच्या मदतीने करण्यासाठी खास डेकोरेशन आयडियाज
यंदा इको फ्रेंडली पद्धतीने गणपतीची आरास करणार असाल तर फुलांचा वापर करून पहा कशी करू शकाल आकर्षक सजावट?
Eco Friendly Decoration Ideas: गणेशभक्तांसाठी दरवर्षी गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) दिवशी घरामध्ये होणारं गणपती बाप्पाचं आगमन आणि त्याची साग्र संगीत पूजा करण्यासाठी वर्षभर असलेली उत्सुकता याला काही तोड नाही. मुंबई, पुणे, कोकण या भागमध्ये पारंपारिक पद्धतीने घरगुती गणेशोत्सव साजरी करण्याची परंपरा आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन मागील काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात केलं जात आहे. त्यामुळे थर्माकोल, प्लॅस्टिकचा वापर टाळत यंदा गणेशोत्सवासाठी मखर सजावट करण्यासाठी फुलांची आरास करण्याचा तुमचा प्लॅन असेल तर पहा फुलांची आकर्षक सजावट करण्यासाठी काय आहेत डेकोरेशन आयडीयाज? गणरायाच्या स्वागतासाठी आणि पूजेसाठी लागणा-या साहित्याची करुन घ्या एकदा उजळणी, येथे पाहा साहित्याची संपुर्ण यादी
महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये दीड दिवसांच्या गणपतीचं आगमन होतं. अशावेळेस आकर्षक फुलांच्या मदतीने गणपतीची आरास कराता येऊ शकते. यामध्ये अनेक परदेशी फुलांचा, ऑर्किडच्या फुलांचा वापर करता येऊ शकतो. यंदा बाप्पासाठी बनवा खास इको फ्रेंडली मखर; थर्माकॉल, प्लॅस्टिकला रामराम करून निवडा 'हे' पर्याय
फुलांची आकर्षक सजावट करण्यासाठी खास डेकोरेशन आयडीयाज
सण-उत्सवाच्या काळात फुलांचे दर वधारलेले असतात पण अनेकांसमोर सणाच्या उत्साहासमोर हे सारं फिकं असतं. पण तुम्ही खरी फुलं आणू शकत नसाल घरच्या घरी कागदाच्या मदतीने फुलं बनवू शकतात. त्याच्या मदतीनेही आकर्षक सजावट केली जाऊ शकते.