Ganesh Chaturthi 2027 Date: आज पाच दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन; पुढच्या वर्षी गणपती दहा दिवस लवकर येणार

पुढच्या वर्षी गणपती बाप्पाचे आगमन दहा दिवस आधी, 4 सप्टेंबर 2027 रोजी होणार असल्याची माहिती पंचांगकर्ते दा.कृ. सोमण यांनी दिली. आज यंदाचे 5 दिवसाचे तर उद्या गौरी गणपतींचेही विसर्जन होणार आहे.

Sarvajanik Ganeshotsav | Wikipedia

दीड दिवसांच्या बाप्पांनंतर आज पाच दिवसांच्या गणेशमूर्तींचे  विसर्जन करण्यात येईल. उद्या 19 सप्टेंबरला गौरी गणपतींचं विसर्जन करून बहुतांश घरगुती बाप्पांच्या सोहळ्याची सांगता होणार आहे. बाप्पाच्या विसर्जनाला यावेळी भाविकांनी "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!" अशी प्रार्थना करत लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप दिला. याच निमित्ताने, पुढील वर्षी गणेशोत्सव नेमका केव्हा सुरू होणार, याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुढच्या वर्षी दहा दिवस आधी आगमन

पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी सांगितले की, पुढील वर्षी गणपती बाप्पाचे आगमन यंदाच्या तुलनेत दहा दिवस आधी होणार आहे. शनिवार, 4 सप्टेंबर 2027 रोजी गणेश चतुर्थी असून, त्याच दिवशी बाप्पाचे घरोघरी आगमन होईल. नक्की वाचा: Gauri Ganpati Visarjan Slogans: गौरी गणपती विसर्जनाला बाप्पाला निरोप देताना जोशात द्या या घोषणा! 

पुढील 11 वर्षांच्या तारखा जाहीर

दा.कृ. सोमण यांनी यावेळी पुढील 11 वर्षांतील गणेश चतुर्थीच्या तारखांचीही माहिती दिली. त्यानुसार, गणेशोत्सव पुढील वर्षांमध्ये खालील तारखांना साजरा होणार आहे:

  • शनिवार, 4 सप्टेंबर 2027
  • बुधवार, 23 ऑगस्ट 2028
  • मंगळवार, 11 सप्टेंबर 2029
  • रविवार, 1 सप्टेंबर 2030
  • शनिवार, 20 सप्टेंबर 2031
  • बुधवार, 8 सप्टेंबर 2032
  • रविवार, 28 ऑगस्ट 2033
  • शनिवार, 16 सप्टेंबर 2034
  • बुधवार, 5 सप्टेंबर 2035
  • रविवार, 24 ऑगस्ट 2036
  • शनिवार, 12 सप्टेंबर 2037

दरवर्षी तारीख का बदलते?

हिंदू पंचांगानुसार सण साजरे करण्याची पद्धत चांद्र आणि सौर दिनदर्शिकेच्या मिश्रणावर आधारित असल्याने, दरवर्षी गणेश चतुर्थीची तारीख बदलत असते. यामुळे काही वर्षी गणेशोत्सव लवकर, तर काही वर्षी उशिरा सुरू होतो.

या माहितीमुळे पुढील वर्षभर आधीपासूनच नियोजन करणाऱ्या भाविकांना आणि गणेशोत्सव मंडळांना मोठा फायदा होणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement