Ganesh Chaturthi Wishes in Marathi: गणेश चतुर्थी निमित्त मराठी Messages, Images, Whatsapp Status वर शेअर करुन द्या गणेशोत्सवाच्या खास शुभेच्छा!
Ganesh Chaturthi Wishes in Marathi: उद्या म्हणजेचं शनिवारी सर्वत्र बाप्पाचं आगमन होणार आहे. सर्व गणेशभक्तांनी बाप्पाच्या आगमनाची तयारी केली आहे. हिंदू परंपरेनुसार, गणेश चतुर्थी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थी या तिथीला साजरा करतात. या दिवशी श्रीगणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुढाकारामुळे सुरू झालेला गणेशोत्सव गणेश चतुर्थीपासून पुढे दहा दिवस साजरा केला जातो.

साधारणतः दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशीला गणेश विसर्जन केले जाते. यंदा कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तुम्ही सार्वजनिक गणेश मंडळाजवळ गर्दी न करता सोशल मीडियाच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देऊ शकता. यासाठी तुम्हाला खालील Messages, Images, Whatsapp Status, Wishes शुभेच्छापत्र नक्की उपयोगात येतील. (हेही वाचा - Ganesh Chaturthi 2020 Modak Recipes: गणेश चतुर्थी निमित्त डबलडेकरपासून फुलांच्या पाकळ्यांच्या आकाराचे उकडीचे मोदक यंदा नक्की ट्राय करा)
श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया!
कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!
गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाची मूर्तीची मुहूर्ताप्रमाणे प्रतिष्ठापना केली जाते. प्रतिष्ठापना पूजेमध्ये आवाहन, स्नान, अभिषेक, वस्त्र, चंदन, फुलं, पत्री आणि नेवैद्य आदी सोळा उपचारांनी षोडशोपचारे गणपतीची पूजा केली जाते. या दिवशी गणपतीची पूजा झाल्यानंतर मोदकांचा प्रसाद दाखवला जातो. गणपतीला 11 किंवा 21 मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. बाप्पाला दुर्वा फारचं प्रिय असल्याने गणपतीची पूजा करताना नेहमी दुर्वांची जुडी वाहिली जाते.
(The above story first appeared on LatestLY on Aug 21, 2020 11:01 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).