Ganesh Chaturthi 2019 Wishes: गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा मराठी ग्रीटिंग्स, SMS, Wishes,GIFs, Images, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन साजरा करा यंदाचा गणेशोत्सव
ज्या गणपती बाप्पाची तुम्ही आम्ही सारेच वाट बघत आहोत त्याच्या आगमनाच्या शुभेच्छा तुम्ही मित्र - मैत्रिण, परिवारासोबत शेअर करण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS,मेसेजेस, Images, GIFs च्या माध्यमातून शेअर व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक स्टेट्सच्या (Facebook Status) माध्यमातून शेअर करा आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या.
Ganesh Chaturthi 2019 Marathi Messages & Wishes: वर्षभर गणेशभक्त ज्या गणपती बाप्पाची आतुरतेने वाट बघत असतात तो सण म्हणजे गणेश चतुर्थी, (Ganesh Chaturthi) आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. यंदा 2 सप्टेंबर 2019 दिवशी घरगुती आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. हिंदू परंपरेनुसार, भाद्रपद शुक्ल चतुर्थी दिवशी गणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्रथा आहे. त्यानुसार गणेशमूर्ती आणून त्याची प्राणप्रतिष्ठा आणि पूजा केली जाते. त्यानंतर पुढील 10 दिवस हा सण साजरा केला जातो. मग ज्या गणपती बाप्पाची तुम्ही आम्ही सारेच वाट बघत आहोत त्याच्या आगमनाच्या शुभेच्छा तुम्ही मित्र - मैत्रिण, परिवारासोबत शेअर करण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, SMS,मेसेजेस, Images, GIFs च्या माध्यमातून शेअर व्हॉट्सअॅप (WhatsApp), फेसबूक स्टेट्सच्या (Facebook Status) माध्यमातून शेअर करा आणि गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा द्या. Ganesh Chaturthi 2019 Pran Pratishtha Muhurat: गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूजा कधी आणि कशी करावी यासाठी मदत करतील ही खास अॅप्स!
महाराष्ट्रासह देशभरात आणि जगभर पसरलेले गणेशभक्त गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी अशा 10 दिवसांच्या काळात गणेशोत्सव साजरा करतात. आराध्य दैवत समजल्या जाणार्या गणरायाला शुभ कार्यात प्रथम स्थान देण्यात आलं आहे. त्यानुसार, विघ्नहर्ता, संकटमोचक असणार्या गणपती बाप्पाच्या आराधननेने सारी संकंट, दु:ख दूर होतात अशी गणेशभक्तांची श्रद्धा आहे. त्यानुसार बाप्पाचा शुभाशिर्वाद या पुढील 10 दिवसांमध्ये तुमच्या प्रियजनांवर रहावा यासाठी या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा नक्की शेअर करा. Ganpati Invitation Marathi Messages Format: घरगुती गणेशोत्सवासाठी मित्रपरिवार, नातलगांना आमंत्रित करण्यासाठी WhatsApp Messages आणि Images च्या माध्यमातून शेअर करा या 'निमंत्रण पत्रिका'
गणेश चतुर्थी शुभेच्छा
- श्रावण सरला, भाद्रपद चतुर्थीची पहाट आली,
सज्ज व्हा फुले उधळायला
गणाधिशाची स्वारी आली
गणपती बाप्पा मोरया!
- वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
- कडकडाट ढोल ताशांचा गरजला त्रिभुवनी,
आनंद शेंदूर अन गुलालाचा पसरला दश दिशातुनी
केवडा, दूर्वा,जास्वंदांच्या फुलांनी लखलखली आरास,
नैवैद्याच्या ताटात उकडीच्या मोदकांचा बेत खास
चला करूया स्वागत गणरायाचे गणेश चतुर्थीचा दिस आज!
Ganesh Chaturthi messages in Marathi 2019 (Photo Credits: File Image)
- तुमच्या आयुष्यातला आनंद असो
गणपती बाप्पाच्या पोटा इतका विशाल,
आयुष्य बाप्पाच्या सोंडे इतके लांब,
प्रत्येक क्षण असो मोदका इतका गोड,
अडचणी असो बाप्पाचं वाहन उंदरा इतक्या लहान,
गणेश चतुर्थीचा सण आज, आलय आनंदाला उधाण
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणेश चतुर्थीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा
गणपती बाप्पा मोरया,मंगलमूर्ती मोरया
GIFs च्या माध्यमातून शुभेच्छा देण्यासाठी
फोटो विथ बाप्पा कॉन्टेस्ट
घरगुती गणेशोत्सवाप्रमाणे महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सवाची देखील मोठी परंपरा आहे. गणेशोत्सव काळात लोकांनी एकत्र यावं, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजप्रबोधनासाठी सण सार्वजनिक स्वरूपात साजरा करण्याची पद्धत सुरू झाली. आज 21 व्या शतकात आता सार्वजनिक गणेशोत्सवाचेही स्वरूप बदलले आहे. यंदा मागील काही दिवसांत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला पूराने झोडपल्याने अनेक गणेश मंडळांनी सण साधेपणाने साजरा करत पूरग्रस्तांना मद्त केली आहे. यंदा तुम्हीही आपलं सामाजिक भन राखत श्रद्धेच्या नावाखाली अन्नाचा, पैशांचा चुराडा ऐवजी सत्कर्मासाठी त्याचा वापर करत गणेशोत्सव साजरा करा.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)