Gandhi Jayanti 2020 Quotes: गांधी जयंती निमित्त त्यांचे मराठी प्रेरणादायी विचार Facebook, Whatsapp वर शेअर करत वंदन करुया बापूजींच्या स्मृतीला!
गांधींजींचे हे विचार सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्टाग्राम या विविध माध्यमातून शेअर करुन गांधी जयंतीच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळी, परिवाराला, कुटुंबियांना देऊ शकता.
Gandhi Jayanti 2020 Quotes in Marathi: भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी. यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरात (Gujarat) मधील पोरबंदर (Porbandar) येथे झाला. 2 ऑक्टोबर हा गांधीजींचा जन्मदिन देशभर 'गांधी जयंती' म्हणून साजरा केला जातो. केवळ भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये या दिवशी गांधीजींचे स्मरण केले जाते. गांधी जयंती निमित्त राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर प्रमुख राजकीय नेते दिल्लीतील राजघाट येथील गांधीजींच्या समाधीचे दर्शन घेतात. पुष्पचक्र अर्पण करतात. सरकारी कार्यालयांमध्ये गांधींजींच्या प्रतिमेला हार घालून गांधीजींच्या पवित्र स्मृतीस वंदन केले जाते. तसंच गांधी जयंती निमित्त संपूर्ण देशात 'ड्राय डे' पाळला जातो. यंदा कोरोना व्हायरस संकट असले तरी अनलॉकींगला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे पालन करुन 'गांधी जयंती' साध्या स्वरुपात साजरी केली जाईल. (गांधी जयंतीच्या शुभेच्छा मराठी Wishes, Quotes द्वारा WhatsApp, Facebook Status वर शेअर करत साजरा करत महात्मा गांधीजींचा जन्मदिन)
सत्य आणि अहिंसेचे व्रत जन्मभर जपणाऱ्या गांधीजींचे विचार प्रेरणादायी होते. भारताचा स्वातंत्र्य लढा देखील त्यांनी याच मार्गाने दिला. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव देशातील नव्हे तर परदेशातील अनेकांवर पडला. आज गांधी जयंती निमित्त त्यांचे काही सहज, सुंदर आणि थोर विचारांची पुन्हा एकदा उजळणी करुया. गांधींजींचे हे विचार सोशल मीडियाच्या व्हॉट्सअॅप (Whatsapp), फेसबुक (Facebook), ट्विटर (Twitter), इन्टाग्राम (Instagram) या विविध माध्यमातून शेअर करुन गांधी जयंतीच्या शुभेच्छा तुमच्या मित्रमंडळी, परिवाराला, कुटुंबियांना देऊ शकता.
महात्मा गांधी यांचे थोर विचार!
हिंसेच्या मार्गाने एखादी गोष्ट साध्य होते तेव्हा ते यश तात्पुरते असते. त्यामुळे होणारे नुकसान मात्र दीर्घकालीन असते.
विचारांनी माणूस घडतो.
तुमचा आनंद तुम्ही केलेला विचार, वक्तृत्व आणि संवाद यावर अवलंबून आहे.
माणसातील चांगले गुण पाहून त्याला मदतीचा हात द्या.
शांततेच्या मार्गाने तुम्ही जगही बदलू शकता.
दीडशे वर्षे राज्य करणाऱ्या इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी महात्मा गांधींनी भारतीय जनतेला सत्याग्रहाचे विलक्षण प्रभावी शस्त्र दिले. दुसरे शस्त्र म्हणजे स्वदेशीचे व्रत. गांधींजींच्या विचारांच्या जोरावर भारताने स्वातंत्र्याचा लढा दिला. देशसेवेसाठी स्वतःला वाहून घेतलेल्या गांधीजींच्या जीवनावर अनेक सिनेमे निर्माण करण्यात आले असून गांधी जयंती निमित्त ते टीव्ही हमखास दाखवले जातात.
'महात्मा' ही त्यांना त्यांच्या कामामुळे मिळालेली उपाधी. तर लोक प्रेमाने गांधीजींना 'बापूजी' असेही म्हणतात. 'वाईट बोलू नका', 'वाईट ऐकू नका' आणि 'वाईट पाहू नका' ही शिकवण देणारी गांधीजींची तीन माकडेही अत्यंत प्रसिद्ध आहेत. तर 'छोडो भारत', 'चले जाव', 'करेंगे या मरेंगे' या त्यांच्या घोषणा देशवासियांच्या आजही स्मरणात आहेत.