Mother's Day 2023 Gift Ideas: मदर्स डे निमित्त DIY ग्रीटिंग कार्ड्सपासून ते वेलनेस स्पा पॅकेजेसपर्यंत तुम्ही आपल्या आईला देऊ शकता 'या' 5 हटके भेटवस्तू!

यावर्षी, मदर्स डे 14 मे 2023 रोजी साजरा करण्यात येईल. जर तुम्ही या दिवशी आपल्या आईला काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी मदर्स डे निमित्त काही भन्नाट गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत.

Gift (Photo Credits: PixaBay)

Mother's Day 2023 Gift Ideas: प्रत्येकाच्या आयुष्यात आई महत्त्वाची भूमिका बजावते आणि ती व्यक्त करण्यासाठी एक दिवस अपूर्ण वाटतो. पण किमान हा दिवस पूर्ण साजरा करणे आणि तुमच्या आईला तुमचे तिच्यावर किती प्रेम आहे हे सांगणे फार महत्वाचे आहे. दरवर्षी मे महिन्याच्या दुसऱ्या रविवारी आंतरराष्ट्रीय मातृदिन साजरा केला जातो. यावर्षी, मदर्स डे 14 मे 2023 रोजी साजरा करण्यात येईल. जर तुम्ही या दिवशी आपल्या आईला काहीतरी गिफ्ट देण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुमच्यासाठी मदर्स डे निमित्त काही भन्नाट गिफ्ट आयडिया घेऊन आलो आहोत.

मदर्स डे 2023 गिफ्ट आयडिया -

वेलनेस स्पा पॅकेज:

सर्वांची आई नेहमी तक्रारी करत असते की, दिवसभराच्या धावपळीमुळे शरीर दुखत आहे. तुमच्या आईला फुल बॉडी मसाज आणि स्पा पॅकेज देऊन तुम्ही त्या वेदना कमीत कमी काही काळासाठी दूर करू शकता. आतील काहीजणांच्या आईल बॉडी स्पा करायला लाज वाटू शकते, परंतु, तिची समजूत घालून तुम्ही तिला पाठिंबा द्या. (हेही वाचा - Mother's Day 2023 Date: मदर्स डे कधी आहे? काय आहे हा दिवस साजरा करण्यामागील इतिहास आणि महत्त्व; जाणून घ्या)

हँडबॅग किंवा स्टायलिश टोट:

काही कारणास्तव, जेव्हा त्यांना बाहेर जायचे असते तेव्हा त्यांच्याकडे परिपूर्ण बॅग नसते. कामासाठी किंवा एक दिवस बाहेर जाण्यासाठी, ते नेहमी सर्वकाही फिट करण्यासाठी दोन पिशव्या घेऊन जातात. स्टायलिश बॅग किंवा पैसे, फोन इत्यादींसाठी योग्य कंपार्टमेंट् असणारी स्टाईलिश बॅग तुम्ही आपल्या आईला गिफ्ट म्हणून देऊ शकता.

DIY कार्ड्स:

जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीसाठी स्वत:च्या हाताने एखादी वस्तू बनलता, तेव्हा ती भेटवस्तूंमध्ये खूपचं खास होऊन जाते. मदर्स डेच्या शुभेच्छा देण्यासाठी तुम्हाला Pinterest प्रतिमा मिळतील. मदर्स डे च्या निमित्त खास कार्ड्स देऊन तुम्ही आईला मातृदिनाच्या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा देऊ शकता.

रोबोट व्हॅक्यूम क्लीनर:

रोबो व्हॅक्यूम क्लीनर घेऊन तुम्ही आईचा त्रास कमी करून तिची मदत करू शकता. हे तिला दररोजचं काम कमी करण्यास नक्कीच मदत करेल. शिवाय, व्हॅक्यूम क्लीनरचा वापर कसा करायचा? हे शिकवण्यासाठी तुम्ही तिच्यासोबत छान सत्र करू शकता.

कॅरिकेचर स्टँड:

संपूर्ण कुटुंबाचे कॅरिकेचर स्टँड करून तुम्ही ते तुमच्या आईला भेट म्हणून देऊ शकता. ही अशी गोष्ट आहे जी तिला नक्की आवडेल. ही भेटवस्तू पाहून तिला नक्कीचं तुमचं कौतुक वाटेल.

या मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तुमच्या आईला वरील कोणतीही भेटवस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता. वैयक्तिकृत भेटवस्तू तयार होण्यासाठी थोडा वेळ लागतो, त्यामुळे तुम्हाला आत्ताच त्यांची योजना सुरू करावी लागेल. तुम्हा सर्वांना मातृदिनाच्या आगाऊ शुभेच्छा.