Friendship Day 2019 Date in India: भारतातील 'फ्रेंडशीप डे' सेलिब्रेशनचा इतिहास काय? कसा केला जातो साजरा?

भारतामध्ये ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा करण्याची प्रथा कशी आणि कुठून सुरू झाली? हे तुम्हांला ठाऊक आहे का?

Friendships Day 2019 (File Image)

Friendship Day 2019 History: भारतामध्ये फ्रेंडशिप डे (Friendship Day) हा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरी केला जातो. यंदा 4 ऑगस्ट 2019 दिवशी भारतामध्ये फ्रेंडशिप डे साजरा केला जाणार आहे. या दिवशी मैत्रीचं नातं जपण्यासाठी ते अधिक खुलवण्यासाठी हा दिवस राखीव ठेवला जातो. संयुक्त राष्ट्राने 2011 साली Official International Friendship Day हा दिवस 30 जुलै दिवशी साजरा केला जातो. जगभरात विविध देशांमध्ये फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या दिवशी साजरा केला जातो. Friendship Day 2019 Quotes: फ्रेंडशिप डे दिवशी Facebook, WhatsApp च्या माध्यमातून महान व्यक्तींचे विचार शेअर करून अधिक घट्ट करा मैत्रीचं नातं!

फ्रेंडशिप डे साजरा करण्याची सुरूवात भारतामध्ये ग्रिटींग्स कार्ड्स इंडस्ट्रीद्वारा सुरू करण्यात आला आहे. भारतामध्ये इंटरनेट आणि सोशल मीडियाचे जाळं पसरत गेल्याने फ्रेंडशीप डे सुरू करण्याला सुरूवात झाली. या दिवसाचं सेलिब्रेशन अधिक लोकप्रिय करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने 1997 साली Winnie-the Pooh या कार्टून कॅरेक्टरला world's Ambassador of friendship घोषित केलं. हा दिवस मित्रांसाठी खास राखीव ठेवला जातो. हातावर फ्रेंडशिप बॅन्ड बांधून, एकमेकांना गिफ्ट देऊन हा दिवस साजरा केला जातो. (Friendship Day 2019 Gift Ideas: तुमच्या हटके मित्रांसाठी 10 हटके गिफ्ट आयडियाज)

फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देण्यासाठी खास व्हिडिओ संदेश 

फ्रेंडशिप डेचं औचित्य साधून देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात त्याचे सेलिब्रेशन केलं जातं. आजकाल सोशल मीडियामुळे वर्च्युअल जगात आपला वावर वाढल्याने यंदाच्या फ्रेंडशीप डे दिवशी वेळ काढून मित्रांना नक्की भेटा.