IPL Auction 2025 Live

Makar Sankranti 2024 Ukhane: मकर संक्रांती आणि हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घ्या 'हे' खास मराठमोळे उखाणे

विवाहित महिला या दिवशी खास उखाणे घेतात. तुम्हालादेखील मकर संक्रांतीनिमित्त उखाणा घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास मराठमोळे उखाणे घेऊन आलो आहोत. हे उखाणे घेतल्यानंतर तुमची नक्कीच वाहवाह होईल.

मकर संक्रांती 2024 (PC - File Image)

Makar Sankranti 2024 Ukhane: आज मकर संक्रांतीचा (Makar Sankranti 2024) सण देशभरात साजरा होत आहे. हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. वैदिक ज्योतिषात, जेव्हा सूर्य देव त्याचा पुत्र शनिदेवाच्या राशीत मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांतीचा (Makar Sankranti) सण साजरा केला जातो. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगा स्नान आणि दान करण्याचे विशेष महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने मनुष्याला पापांपासून मुक्ती मिळते आणि शुभ परिणाम प्राप्त होतात.

मकर संक्रांतीचा सण विवाहित महिलांसाठी खास असतो. या दिवशी त्या साजृ-शृंगार करतात. तसेच एकमेकींना मकर संक्रांतीनिमित्त वाण देऊन हळदी-कुंकवू लावतात. मकर संक्रांतीपासून रथसंप्तमीपर्यंत हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या सणाला उखाण्याचे खूप महत्त्व आहे. विवाहित महिला या दिवशी खास उखाणे घेतात. तुम्हालादेखील मकर संक्रांतीनिमित्त उखाणा घ्यायचा असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास मराठमोळे उखाणे घेऊन आलो आहोत. हे उखाणे घेतल्यानंतर तुमची नक्कीच वाहवाह होईल. (हेही वाचा - Happy Makar Sankranti 2024 HD Images: मकर संक्रांतीनिमित्त WhatsApp Status, Messages, Wallpapers द्वारे द्या नात्यात गोडवा निर्माण करणाऱ्या सणाच्या शुभेच्छा!)

मकर संक्रांतीला उत्तरायण सण असेही म्हणतात. वास्तविक मकर संक्रांतीला सूर्य उत्तरायण होतो. सूर्याची उत्तरायण हा देवांचा दिवस मानला जातो. सूर्यदेव उत्तरायणात 6 महिने आणि दक्षिणायन 6 महिने राहतात. सूर्य उत्तरायण झाल्यावर आणि मृत्यू पावल्यावर मोक्ष प्राप्त होतो. महाभारताच्या युद्धात भीष्म पितामहांनी सूर्याच्या उत्तरायणात बलिदान दिले होते.