Father's Day 2020 Gift Ideas: फादर्स डे दिवशी बाबांना खूष करण्यासाठी बनवू शकता या घरच्या घरी भेटवस्तू!
दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 21 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. सध्या कोरोनाच्या प्रसारामुळे आपणास बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉल्समध्ये जाता येणार नसल्याने घरी बसल्या सोप्पे आणि स्वस्त भेटवस्तू आपण आपल्या वडिलांसाठी बनवू शकता.
जगभरातील वडिलांचा सन्मान आणि प्रेम करण्यासाठी फादर्स डे दरवर्षी साजरा केला जातो. दरवर्षी जूनच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यावर्षी 21 जून रोजी फादर्स डे साजरा केला जाईल. ज्याप्रमाणे मुलाच्या आयुष्यात आईचे योगदान अतुलनीय असते, त्याचप्रकारे वडिलांचे प्रेम, त्यांचं फाटकारणे आणि समज देखील मुलाच्या भवितव्यास हातभार लावते. त्यामुळे, फादर्स डे वर वडिलांना खास वाटू द्या. विश्वास ठेवा जर तुम्ही तुमच्या हाताने बनवून तुमच्या वडिलांना भेटवस्तू दिली तर तुमच्या वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळे आनंद हसू येईल. सध्या कोरोनाच्या प्रसारामुळे आपणास बाहेर हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये किंवा मॉल्समध्ये जाता येणार नसल्याने घरी बसल्या सोप्पे आणि स्वस्त भेटवस्तू आपण आपल्या वडिलांसाठी बनवू शकता. (Fathers Day 2020: पिता-पुत्राची धमाल! भारताच्या बाप-लेकांच्या 'या' जोडीने अनेक वर्ष गाजवलं आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट)
शिवाय, सर्वात खास माणसाला या दिवशी छान वाटेल म्हणून इतरही बरेच काही आपण घरी करू शकता. आपल्या वडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यास मदत करू शकणार्या काही आयडियाज येथे पाहा:
हाताने पेंट केलेला टी-शर्ट:
वैयक्तिकृत फोटो टी-शर्ट साहजिकच सुंदर आयडिया आहेत, परंतु त्यापेक्षा चांगले काय आहे हे आपल्याला माहिती आहे? अत्यंत प्रेमाने स्वहाताने रंगवलेला टी-शर्ट. यावर आपल्या वर्दिलाचें आवडते व्यंगचित्र पात्र रंगवू शकता किंवा कदाचित काही शब्द किंवा ओळ लिहा जे ते वारंवार म्हणत असतात. यासारखी भेट पाहून तुमचे वडिल नक्कीच भारावून जातील.
होममेड केक
केक ही सर्वात मूलभूत गोष्टींपैकी एक आहे जी सामान्य दिवसाला एका विशेष दिवसात बदलू शकते. या फादर्स डे दिवशी आपले सर्व साहित्य गोळा करा आणि आपल्याकडे असलेले आतील शेफ जागा करून स्वादिष्ट होममेड केक बनवा. यामुळे, आपल्या वडिलांच्या जिभेवरील चव जास्त काळ फक्त टिकणारच नाही तर त्याचं हृदयही प्रेमाने भरुन जाईल.
कार्ड
हे दिसायला सहज असले तरी बिनशर्त प्रेमाने तयार केलेले कार्ड कोणत्याही मोठ्या भेटवस्तूपेक्षा कमी नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भेटवस्तूसाठी कोणतीही विशेष व्यवस्था देखील आवश्यक नसते. त्यामुळे, अजून वेळ वाया घालवू नका आणि आत्ताच कार्ड बनवणे सुरु करा आणि त्यामध्ये आपले प्रेम दर्शवा.
त्यांचा आवडता पदार्थ बनवा
सामान्य परिस्थितीत तुम्ही बहुधा दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणासाठी बाहेर गेला असता. परंतु आपण यावर्षी हे करू शकत नसल्याने आपणच त्यांचे 'मास्टर शेफ' बना आणि त्यांच्यासाठी त्यांचे आवडीचे पदार्थ बनवा.
ग्रूमिंग किट
बहुतेक वडिलांना स्वत: ची काळजी घेण्यासाठी वेळ मिळालेला दिसत नाही. या फादर्स डे दिवशी तुम्हाला काही फळे, भाज्या आणि पाने मिळोत ज्याने तुम्ही 100% सेंद्रिय फेस मास्क, स्क्रब इत्यादी बनवू शकाल. आपण त्याची काळजी घेत असल्याचे आपल्या वडिलांना जाणवून द्या.