Eid Mubarak 2019: रमजान ईद निमित्त सौंदर्य खुलवण्यासाठी खास, ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स, पहा Videos

नवीन कपडे घालून, मेहंदी काढून आणि सजून नटून ईदच्या सणासाठी तयार होतात.

Trendy Mehandi Designs for Ramzan Eid (Photo Credits: Pixabay)

Eid Mubarak 2019: मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणारा रमजान ईद (Ramzan Eid) हा सण काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे सर्वत्र जय्यद तयारी सुरु आहे. मुस्लिम बांधव या दिवशी चंद्रदर्शन घेऊन ईदचा सण साजरा करतात. एकमेकांना शुभेच्छा देतात. गोडाधोडाचे अन्न ग्रहण करतात. ईदच्या या आनंदात आबालवृद्ध सहभागी होतात.

ईदच्या या उत्साहात स्त्रिया-मुली यांना नटण्या-सजण्याचा उत्साह अधिक असतो. नवीन कपडे घालून, मेहंदी काढून आणि सजून नटून ईदच्या सणासाठी त्या तयार होतात. ईदच्या या खास दिवसानिमित्त मेहंदी काढून आपले सौंदर्य खुलवण्यासाठी काही हटके आणि ट्रेंडी मेहंदी डिझाईन्स....

Mehandi Designs for Ramzan Eid 2019 (Photo Credits: Pixabay)
Mehandi Designs for Ramzan Eid 2019 (Photo Credits: Pixabay)
Mehandi Designs for Ramzan Eid 2019 (Photo Credits: Pixabay)
Mehandi Designs for Ramzan Eid 2019 (Photo Credits: Pixabay)
Mehandi Designs for Ramzan Eid 2019 (Photo Credits: Pixabay)

मेहंदी डिझाईन्स व्हिडिओज:

इस्लामिक दिनदर्शिकेनुसार, नववा महिना हा रमजानचा असतो. या महिन्यात रोजे केले जातात. या काळात सुर्योदयापूर्वी आणि सुर्यास्तनंतर पाणी, अन्न ग्रहण केले जाते. सकाळी सुर्योदयापूर्वी अन्नग्रहण केले जाते त्यास 'सहेरी' तर सुर्यास्तानंतर केल्या जाणाऱ्या अन्न ग्रहणास 'इफ्तार' असे म्हणतात.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif